श्रीवर्धन 

श्रीवर्धन शहरांत दि. 24 रोजी जवळजवळ दिवस भर, पूर्ण रात्र आणि दि. 25 रोजी अर्धा दिवस वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांची खूपच गैरसोय झाली. वीजेवर चालणारी पाण्याच्या मोटर्स, वॉशिंग मशिन्स, टी. व्ही. इ. सर्व यंत्रणा ठप्प झाली होती. इन्व्हर्टर्सची क्षमताही संपली होती. व्यापारी वर्गाचेही वीजेअभावी नुकसान झाले.

परंतु वीज यंत्रणा बंद पडण्याच्या कारणांचा शोधघेतला असता असे समजले की, वरील कालावधीत कुठेविजेचे पोल पडले तर कुठे इन्सुलेटर पंक्चर झाले होते.प्रामुख्याने चिनी मातीचे इन्सुलेटर पंक्चर होण्यामुळे वीज पुरवठा खंडित होत होता. पंक्चर इन्सुलेटरमधून जर दवाचे पाणी गेले तर थेट पोलला शॉर्ट करते व आपोआप वीज पुरवठा बंद होतो आणि असा फॉल्ट लवकर मिळतही नाही.त्यासाठी 12 मी. उंचीच्या प्रत्येक पोलवर चढून फॉल्ट शोधावा लागतो. रात्रीच्या वेळी इतक्या उंचीवर चढणे फार धोक्याचे असते अशी माहिती मिळाली. तरीही या सर्व दिव्यातून जाऊन महावितरणचे कर्मचारी कसलीही पर्वा नकरता काम करीतच असतात. त्यामुळे महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदनच करायला हवे.

 

अवश्य वाचा