अलिबाग 

प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय अलिबाग तर्फे रामनारायण पत्रकार भवनात मराठी राजभाषा दिनानिमित्त वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांच्या प्रतिमेला वाचनालयाचे जेष्ठ संचालक सखाराम आण्णा पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

प्रास्ताविक रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तसेच  ग्रंथमित्र नागेश कुलकर्णी यांनी केले.  या कार्यक्रमप्रसंगी पोलीस पाटील संघटनेचे विकास पाटील, अँड.राजेंद्र जैन,लेखक व नाट्यनिर्माते शरदजी कोरडे,महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे आरोग्य कमिटीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष उमेश करंबत,दै.वादळवाराचे प्रतिनिधी राजेश बास्टे, हेमकांत सोनार आदि यावेळी उपस्थित होते. 

अवश्य वाचा