माणगाव 

राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण अशा ओळखल्या जाणार्‍या  रायगड जिल्ह्यातील  माणगाव नगरपंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी उपनगराध्यक्षा शुभांगी उद्धव जाधव यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे या रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षा पदासाठी 4 मार्च 2020 रोजी निवडणूक जाहीर झाली आहे.

 या उपनगराध्यक्ष पदासाठी माणगाव नागरपंचायतीचे वार्ड क्र.2 मधून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक दिलीप महादेव जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा माणगाव नगरीत सुरु आहे. या पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा   शुक्रवारी (28 फेब्रुवारी ) हा शेवटचा दिवस आहे.या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षातर्फे दिलीप जाधव यांचा नामनिर्देशन अर्ज दाखल होणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते.या   निवडणुकीचे पीठासन अधिकारी म्हणून माणगाव तहसीलदार प्रियांका आयरे कांबळे या काम पाहणार आहेत.

राज्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना व काँग्रेस आय अशी महाविकास आघाडी असल्याने माणगाव नगरपंचायतीतही   आघाडी राहील असे चर्चेतून बोलले जात आहे.त्यामुळे दिलीप जाधव यांचीच उपनगराध्यक्ष पदी वर्णी लागेल असे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. मात्र अंतिम अधिकार पक्षश्रेष्ठी खा.तटकरे यांच्याकडेच राहतील हे मात्र तितकेच खरे आहे.

 

अवश्य वाचा