नेरळ 

कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा पोशीर, देवपाडा, आंथ्रडनिड या तिनही शाळांना थिंक शार्प फाउंडेशन आणि सोलार व्हिलेज प्रोजेक्ट(अमेरीका) यांच्या माध्यमातून सोलार बसविण्यात आले आहेत. शाळेत 1 किलोवॅट क्षमतेचे सौर पॅनल बसविण्यात असून त्यासोबत 2.2 किलो वॅटचा सोलार इनव्हर्टर बसविण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सोलर दिवे देण्यात आल्याने विद्यार्थ्यांची विजेअभावी अभ्यास करण्यात मदत होणार आहे.

तसेच देवपाडा शाळेत सोलार सोबतच थिंक शार्प फाउंडेशनच्या माध्यमातुन मिळालेल्या भव्य अशा ग्रंथालयाचे उद्घाटन मोठया उत्साहात करण्यात आले. थिंक शार्प फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष फड आणि अस्मी एनर्जीचे संचालक विकास दुखंडे तसेच डॉ. दिवाकर यांच्या उपस्थितीत सोलार शाळा व ग्रंथालय यांचा विद्यार्थी अर्पण सोहळा पार पडला.

कर्जत तालुक्यातील या तीनही शाळा दुर्गम भागातील असून येथे पहिली ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात. विजेचा तुटवडाही एक मोठी समस्या यापुर्वी शाळांना भेडसावत होती. त्यामुळे शाळा डिजीटल करणे, विद्यार्थ्यांना प्रकाश आणि पंखे इत्यादी गोष्टींसाठी अखंडीत विज पुरवठयाची कमतरता भासत होती. तसेच लाईटचे बिल भरणे देखील एक मोठा प्रश्‍न होता. त्यामुळे या समस्या सुटल्या शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कार्यक्रमास ग्रामस्थ, शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. 

 

अवश्य वाचा