नेरळ  

नेरळ येथील गोल्डन गँग टीम च्या वतीने जैन प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे.रायगड ,ठाणे आणि पुणे जिल्ह्यातील जैन धर्मीय खेळाडू यांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून लीग पध्दतीने खेळविल्या जाणार्‍या या स्पर्धेला नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात सुरुवात झाली आहे.

नेरळ मधील गोल्डन गँग टीम कडून सलग दुसर्‍या वर्षी जैन प्रीमियर लीग चे आयोजन करण्यात आले आहे.लीग पध्दतीने खेळविल्या जाणार्‍या या स्पर्धेत नेरळ,कल्याण,रसायनी, खोपोली,कल्याण,बदलापूर,मोहोपाडा,पाली,कामशेत,लोणावळा,तळेगाव हे संघ सहभागी झाले आहेत.नेरळ मधील शिवाजी महाराज मैदानात आयोजित स्पर्धेचे उद्घाटन जैन समाजातील जेष्ठ नागरिक नेरळ ग्रामपंचायतचे माजी सदस्य घेवरचंद जैन,तसेच रमेश जैन,सोहनलाल जैन,ललित जैन,विनोद जैन,शंकलेश जैन आदी उपस्थित होते.सलग दुसर्‍या वर्षी आयोजित केलेल्या या स्पर्धेचे आयोजन गोल्डन गँग टीम चे भैरव जैन,दिलीप जैन,समीर जैन,धीरज जैन,विशाल जैन,अमित जैन,राजा जैन,नीरज जैन यांनी केले आहे.प्रत्येक सामना चार षटकांचा होणार असून साखळी पध्दतीने सामने झाल्यानंतर बाद पध्दतीने सामने होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.या स्पर्धेसाठी नेरळ मधील आमच्या आपल्या आठवडा सुट्टीच्या दिवशी स्पर्धा आयोजित केली आहे.

 

अवश्य वाचा