सुतारवाडी 

रोहे तालुक्यातील धानकान्हे येथे गावदेवी क्रीडा मंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने आ.अनिकेत तटकरे आमदार चषकाचे आयोजन ता.22 रोजी करण्यात आले होते.या स्पर्धेत अंतिम सामन्यात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत नवतरूण स्पोर्ट्स कारावी या संघाने सर्वोत्तम खेळ करीत आमदार चषकाचा मानकरी होण्याचा बहुमान पटकावला.

या स्पर्धेचे उद्घाटन विधानपरिषद आ.अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी पेण विधानसभा मतदार संघाचे माजी आ.धैर्यशील पाटील, शेकाप जेष्ठ नेते शंकर म्हसकर, कबड्डी असो.अध्यक्ष विजय मोरे,जेष्ठ नेते अर्जून कचरे,रामचंद्र चितळकर, बाबूराव बामणे,मारुती खांडेकर, ज्ञानदेव भोईर,सरपंच वसंत भोईर,उपसरपंच सूरज कघ्चरे,उद्योजक तांडेल, युवानेते संजय राजिवले, संजय मांडलुस्कर,राकेश शिंदे,नरेंद्र जाधव, जयवंत मुंढे,मंगेश भोईर,प्रमोद शिंदे,राजेश सुटे,संदेश कापसे,रमण कापसे,संतोष भोईर,दयाराम भोईर,महादेव माहित, धोंडू कचरे,सखाराम कचरे,पांडुरंग कचरे,पांडुरंग गोसावी,शाम लोखंडे,नारायण कान्हेकर,प्रदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाभरातून मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या व नावाजलेले संघ तसेच खेळाडू यांचा खेळ पाहण्यास मिळाल्याने क्रीडाप्रेमी नागरिक यांनी समाधान व्यक्त केले. तर प्रथम क्रमांक नवतरुण स्पोर्ट्स कारावी, द्वितीय क्रमांक नवतरुण कारावी, त्रुतीय व चतुर्थ क्रमांक अनुक्रमे जय हनुमान रासळ व जय हनुमान वाशी या संघांनी पटकावले. तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू राज पाटील ( नवतरुण स्पोर्ट्स कारावी),उत्कृष्ट चढाई  राहुल मोकल(नवतरुण कारावी),उत्कृष्ट पक्कड प्रतिक भोईर(जय हनुमान वाशी),तर पब्लिक हिरो म्हणून राहुल भोईर(जय हनुमान रासळ)यांना उपस्थित पाहुण्यांचे हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेचे यशस्वीतेसाठी गावदेवी क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थ मंडळ धानकान्हे यांनी मोलाचे सहकार्य केले.

 

अवश्य वाचा