मोहोपाडा :

 

   माळशेज घाटाच्या अलिकडे मुख्य डोंगररांगे पासून बाहेर आलेल्या डोंगरावर भैरवगड किल्ला आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी गाव आहे. या गावाच्या मागे भैरवगड किल्ला आहे. किल्ल्याची रचना पाहाता या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा.प्रत्येक भटक्यांना खुनावणारा सहयाद्री मधील थरारक हा ट्रेक म्हटलं जातं.साहसी ट्रेकिंगवीरांची पंढरी म्हणून हा ट्रेक ओळखला जातो.प्रत्येक साहसी ट्रेकर्सचे हा ट्रेक करायचे स्वप्न असते.चौक- खालापूरच्या शिवकार्य ट्रेकर्सने सर केला.यामध्ये शिवकार्य ट्रेकर्स चे संस्थापक रोहिदास ठोंबरे सर,ट्रेकिंग परीक्षक रवी भला,आकाश गोडीवले,शरद मालकर,जयराम लचके आणि विनायक मोरे यांनी सहभाग घेतला.

      या गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे,सफर सहयाद्री ट्रेकर्सचे प्रमुख किरण भालेकर सर,व भैरवगडचे वनाधिकारी लखन पवार सर आणि गिर्यारोहण तंत्र अवगत असलेला रवी भला यांच्या मार्गदर्शनाखाली गडकिल्ले भटकंती फेम रोहिदास ठोंबरे सर व त्यांच्या टीमने हा ट्रेक सर केला.जिथे सूर्यकिरणांना  सकाळी अकरा वाजेपर्यंत वाट पाहावी लागते अशी विशालकाय कातळभिंत. सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लाव्हा रसामुळे झालेली आहे.या लाव्हारसाचे थर थंड होतांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात. त्यापैकी एक रचना म्हणजे डाईक. ही रचना आपल्याला भैरवगडावरती पाहायला मिळते.डाईक म्हणजे लाव्हारसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसाल्ट खडकाची तयार झालेली भिंत.समुद्रसपाटीपासून ४००० फूट उंच असलेला हा किल्ला थरारक ट्रेक म्हणून ओळखला जातो तो म्हणजे चक्क ९० अंशातला सरळसोट ताशीव कडा.जोखमीचा,दमछाक करणारा,घसरगुंडी आणि चढ तुडवीत वरती उंच ठिकाणी घेऊन जाणारा हा साहसी ट्रेक म्हणून ओळखला जातो.

    भैरवगडाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला अवाढव्य डोंगराच्या कडा.त्यामुळेच प्रत्यक्ष खिंडीत आल्याशिवाय गड सर करण्यासाठी पायऱ्यांचा रस्ता आहे हे कळणे कठीणच.गडाच्या पायऱ्या अतिशय खुबीने लपवल्या आहेत.ह्या पायऱ्या म्हणजे मानवीय सुंदर कलाकृती आहे.गडाच्या पायथ्याशी एक आयताकृती मोठं बारमाही पाण्याचे टाके आहे तर गडावर दोन पाण्याचे टाके आहेत पण उन्हाळ्यात वरती पाणी राहत नाही.गडमाथ्यावर गेल्यावर डावीकडून नानेमावळ्याचा सदाबहार नाणेघाट,उजवीकडे लांबवर पसरत गेलेला हरिश्चंद्रगड, कालाडगड,रोहिदास शिखर,कळसूबाई शिखर दिसतो.

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास