खांब-रोहे 

कोलाड विभाग कबड्डी असो.च्या मान्यतेने व गावदेवी क्रीडा मंडळ बाहे तसेच ग्रामस्थ मंडळ बाहे येथे संपन्न करण्यात आलेल्या विभागीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात आपल्या होमपिचवर कमाल करीत बाहे हा संघ अंतिम विजेता ठरला आहे.

सरपंच वसंत भोईर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या कबड्डी सामन्यांचे वेळी श्याम लोखंडे, रवी राऊत, काशीनाथ थिटे, जगदीश थिटे, मनोज थिटे, राजेश ठाकूर, कोलाड असोसिएशनचे अध्यक्ष महेश ठाकूर, खजिनदार मिलिंद पवार, मारुती थिटे, गोपाळ ठाकूर, लिंबाजी थिटे, दिनेश माठळ,रोशन ठाकूर, शिवाजी साळसकर, राकेश देवकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. क्रीडाप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग लाभलेल्या या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पाले खुर्द, तृतीय व चतुर्थ क्रमांक अनुक्रमे सापया वरसगाव व दुरटोली या संघांनी पटकावला. तर सामनावीर म्हणून विजय माठल बाहे, उत्कृष्ट चढाई गणेश खांडेकर, वरसगाव व उत्कृष्ट पक्कड शुभम पाले यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गावदेवी क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.