अलिबाग 

नुकत्याच झालेल्या मुंबई महापौर चषक बुडो कप स्पर्धेत क्युडोकान कराटे डो इंडिया च्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून अनेक पदके मिळवून तृतीय क्रमांकाची ट्रॉफी पटकावली.

बुडो असोसिएशन महाराष्ट्र, संलग्न इंटरनॅशनल बुडो फेडरेशन इंडिया आणि जर्मनी यांनी आयोजीत केलेल्या या स्पर्धेचे अनेक स्पर्धकांनी हजेरी लावून काता तसेच कुमिते या प्रकारांमध्ये आपले कौशल्य दाखवले. सदर स्पर्धा ही समर्थ भारत व्यायाम मंदिर माटुंगा येथे दिनांक 23 फेब्रुवारी रोजी पार पडली. विजेत्यांमध्ये कु. वैष्णवी जमखंडी-कुमिते - (सुवर्ण पदक) काता (सुवर्ण पदक), कु. विनायक जमखंडी - कुमिते - (सुवर्ण पदक) काता (रौप्य पदक), कु.  दुर्वा महाडिक - कुमिते (सुवर्णपदक) काता (कांस्यपदक), कु. रिशिता अरेनकेरी - कुमीते - (सुवर्णपदक), कु. पर्णिका महाडिक - कुमिते (रौप्य पदक) काता (रौप्य पदक), कु. वैष्णवी गुडुलकर - कुमिते (रौप्यपदक), कु. दीप चव्हाण - कुमिते (रौप्यपदक), कु. अमोघ गोले - कुमिते - (रौप्य पदक), कु. उपासना मोरे - कुमिते - (कांस्यपदक), कु. श्री भायदे - कुमिते- (कांस्यपदक) यांचा समावेश आहे.  या सर्व विद्यार्थ्यांना नवी मुंबईचे मुख्य प्रशिक्षक तसेच आतंरराष्ट्रीय पदक विजेते सेन्सेई प्रसाद चौलकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे भारताचे मुख्य प्रशिक्षक रेंशी अरुण बोडके यांनी कौतुक केले. तसेच सेन्सेई विनायक सकपाळ, मुख्य प्रशिक्षक रियु क्यू कोबुडो रियुकोनकाय आणि रायगड चे मुख्य प्रशिक्षक सेन्सेई अरविंद ग भोपी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.