आपल्या लोकांनी इतिहासाकडे दुर्लक्ष केल्याने बहुतांशी आपण मुसलमानांनीच लिहिलेल्या इतिहासावर अवलंबून असतो. त्यामुळे अकबरासारखा कपटी, स्वार्थी, धोरणी, मुत्सुद्दी जगातील सर्वश्रेष्ठ अशा राजांच्या पंगतीत जाऊन बसतो. आपल्या भारतीय इतिहासकारांनी त्याची तुलना तर चक्क अशोकाबरोबर केली. परिणामी, हिंदू स्त्रियांचा त्याच्यासाठी भरणारा मीना बाजार, नावडत्या लोकांना पानाच्या विड्यात विष घालून मारणे, इतकेच काय, पण विज्ञानाच्या नावाखाली गर्भाची वाढ तपासण्यासाठी गर्भवती स्त्रियांची पोटे फाडणे, मुलांची उपजत बुद्धी पाहण्यासाठी त्यांना एकांतात कोंडून कायमचे मतिमंद बनवणे, या त्यांच्या सार्‍या कृत्याकडे इतिहास दुर्लक्ष करतोय.

अकबर हा हिंदू-मुस्लिम ऐेक्याचा पुरस्कर्ता, त्यामुळे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. कारण, म्हणे त्याची पट्टराणी जोधाबाई हिंदू होती. अकबराने हिंदू स्रियांशी विवाह केला, पण त्याने त्याच्या बहिणीइतकेच काय, पण साधी मुसलमान स्त्री कुणा राजपूत राजाच्या दावणीला बांधली नाही. हेमूबरोबर झालेल्या युद्धात हिंदूंबाबत तो कसा होता हे लक्षात येते. पुढे चितोडचा पाडाव करताना त्याच्या हिरव्या मनोवृत्तीचे मनसोक्त दर्शन होते ते असे.

मेवाडची राजधानी चितोड येथे सिसोदियावंशी राणासिंगाचा पुत्र उद्यसिंह राज्य करीत होता. बाबराबरोबर झालेल्या लढाईत जरी राणारसिंगाचा पराभव झाला असला, तरी राजधानी चितोड शाबूत होती. चितोडचे सार्वभौमत्व अकबराच्या डोळ्यात खुपत होते. तेव्हा चितोड जिंकल्याशिवाय राजपुतांवर आपला अंमल बसणार नाही, हे अकबर पूर्णपणे ओळखून होता. लढण्यासाठी त्याला काही तरी निमित्त हवे होते. माळव्याचा बंडखोर बाझ बहादूरला उदयसिंहाने आश्रय दिला होता. शिवाय, जयपूरच्या भारमलने आपली कन्या अकबराला देऊन आपले राज्य टिकविण्यासाठी जो एक हिंदू धर्माला लांच्छनास्पद, घृणास्पद असा प्रकार त्याने सुरू केला होता. त्याचाही निषेध राणा उदयसिंहाने केला होता. या कारणांमुळे अकबराने 20 ऑक्टोबर 1567 रोजी स्वतः जातीनिशी चितोडगडला वेढा दिला. ‘गड में गड चितोड गड’ अशी एक म्हण आहे. चितोड हा अजिंक्य व मजबूत असा प्रचंड गड. तोफा, बंदुका यांचा मारा परिणामकारक ठरत नसे. राणा उदयसिंह आपली पत्नी, मुले बाळे- त्यात राणाप्रतापही होता, या सार्‍यांना  घेऊन ‘अरवली’ हा सुरक्षित स्थळी गेला. चितोडच्या रक्षणासाठी पराक्रमी आठ हजार राजपूत ‘जयमल’ नामक सरदाराकडे होते. वेढा चार महिने चालला. पण, राजपूत नमले नाहीत. सुरेगाने किल्ल्याच्या तटाला भगदाड पडले. राजपुतांनी ते रातोरात बुजवले. अशा प्रकारे दररोज अकबराचे 200 सैनिक मरत होते. पण माघार घ्यायची नाही, हे अकबराने ठरवले होते. संग्राम नावाच्या आपल्या बंटुकीने अकबराने जयमलास ठार मारले तेव्हा राजपुतांचे अवसान गळाले. सरदार फतेसिह यांच्या नेतृत्वाखाली राजपुतांनी एक जोराचा प्रहार मोगली फौजेवर केला, पण तो अपयशी ठरला. अखेरीस 25 फेबुवारी 1568 रोजी किल्ला अकबराच्या हाती लागला. तत्पूर्वीच, आपली विटंबना टाळण्यासाठी गडावरील हजारो स्त्रियांनी जोहार केला. त्यात नऊ राण्या व पाच राजकन्याही होत्या.

चितोडचा पाडाव होताच, सूड म्हणून अकबराचे हिरवे रक्त उसळले. दहशतीच्या नावाखाली राजपुतांची कत्तल करण्याचे आदेश अकबराने आपल्या सैन्याला दिले. अब्बुल फझलच्या म्हणण्याप्रमाणे 30 हजार राजपुतांची कत्तल अकबराने केली. ठार झालेल्यांची जानवी गोळा केली असता ती 74.5 मण इतकी (294 किलो) भरली आणि म्हणे हा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कर्ता. 800 वर्षे रक्ताचे पाट वाहवून लाखो राजपुतांनी चितोडचे रक्षण केले होते. चितोड हे उत्तरेत हिंदूंच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक होते. चितोडच्या पाडावाने इतर राजपूत राजे घाबरले. रणथंबोरचा सुरजमल, कलिंगचा रामचंद्र, जोधपूरचा चंद्रसेन, बिकानेरचा रायकल्याणमल इत्यादी राजपुतांची अकबराचे स्वामित्व पत्करण्याची स्पर्धाच सुरु झाली व ती इतकी खालच्या पातळीला गेली, की बिकानेर व जैसलमेर नरेशांनी अकबराला आपला जावई करून घेतले.  

अवश्य वाचा