श्रीगाव

 नक्षत्रांच देणं काव्यमंच महाराष्ट्र शाखा जुन्नर तालुक्याच्या वतिने  सहावे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसम्मेलन 22व 23 फेबृवारी रोजी श्री क्षेत्र ओझर पुणे येथे संपन्न झाले. या समेमलनात रायगड जिल्ह्यातील कवी-कवयित्रींता सन्मान करण्यात आला. या सम्मेलनाचे सम्मेलनाध्यक्ष लोककवी डॉ. विठ्ठल वाघ हे होते.

या सम्मेलनात महाराष्ट्र राज्यातुन सुमारे सहाशे कवी उपस्थित होते यामधे नक्षत्रांच देण काव्यमंच रायगड जिल्हाध्यक्ष संजीव शेरमकर(रोहा),सल्लागार व गझलकार ज्योती शिंदे(रोहा),कार्याध्यक्षा आरती धारप(रोहा),सचिव व अलिबाग तालुकाध्यक्ष सचिन पाटील(श्रीगाव,अलिबाग),संपर्क प्रमुख रमेश कांबळे (गोरेगाव)या रायगडमधील नक्षत्रांचा सम्मैलनाध्यक्ष लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्याहस्ते  मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला त्यावेळी महाकाव्यसमैलनाचे उद्घाटक जगन्नाथ कवाडे,स्वागताध्यक्ष शिवनेर भुषण तात्यासाहेब गुंजाळ, नक्षत्रांच देणं काव्यमंचचे संस्थापक अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनावणे व इतर मान्यवर उपस्थित होते.