नेरळ 

   नेरळ शहरात अनेक ठिकाणी कचर्याचे ढिग पहायला मिळत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. शहरातील शहिद मार्गावर देखील कचर्याचे साम्राज्य असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. याकडे ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

     रायगड जिल्हयातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून नेरळ ग्रामपंचायतीचा उल्लेख केला जातो. परंतू कोणत्याही प्रकारे नियोजन या ग्रामपंचायतीकडे नसल्याने समस्यांचा ढिगच नेरळ शहरात पहायला मिळत आहे. अनेक भागात घंटागाडी नियमित जात नसल्याने रस्त्यारत्यावर कचराकुडयांभोवती प्लॅस्टिक पिशव्यासह कचरा बाहेर पडलेला दिसून येतो. त्यामुळे परिसरात दुःर्गधी पसरत आहे. तसचे विशेष म्हणजे 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा शहीद योगेश शिवाजीराव पाटील यांच्या नावाने नेरळमध्ये एका रस्त्याला शहिद मार्ग असे नाव देण्यात आले आहे. मात्र या फलकाशेजारीच कचारा कुंडी असून बाहेर कचर्याचे ढिग पहायला मिळत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

    जर एखाद्या मार्गाला संत, हुतात्मा, थोर पुरषांची नावे दिली तर त्यांचे गांभीर्य देखील असणे गरजेचे आहे. मात्र नेरळ ग्रापंचायतीला यांच गाभीर्य नसल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे संत, थोर महापुरूष तसेच हुतात्मा यांचे नाव दिलेल्या रस्त्यांची चांगली स्वच्छता करावी अशी मागणी नेरळमधील नागरिकांकडून केली जात आहे.