उरण 

 उरण तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या चिरनेर येथील कोकण एज्यूकेशन सोसायटीचे सेकंडरी स्कूल चिरनेर या शाळेतील 1990 साली  एस.एस.सी.मध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांचा तब्बल 30 वर्षानंतर चिरनेर येथील निवृत्त ग्रामविकास अधिकारी कृष्णा सोमा केणी यांच्या पुरणशेत येथील फार्म हाऊसवर मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.

 स्नेहमेळाव्या निमित्त एकत्र आल्याने शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्यात येऊन या विद्यार्थ्यांना  ज्ञानदान करणार्‍या शिक्षाकांच्या शिस्त सर्वांना फळास आली असल्याचे बहुतांशी मित्रांच्या  वक्तव्यातून सांगण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सेकंडरी स्कूल चिरनेर शाळेचे दहावी बॅचलर विद्यार्थी गणेश चिरणेरकर,प्रसाद फोफेरकर, जीवन केणी,सुभाष कडू यांच्यासह गुजरात राज्यात एका कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले मोहन ठाकूर यांच्यासह सर्वांनीच अधिक मेहेनत घेतली.