उरण,

वशेणी इतिहास संपादकीय मंडळा तर्फे नुकताच उरण तालुक्यातील वशेणी गावात निबंध स्पर्धा   आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेत इयत्ता पाचवी ते आठवीच्या लहान गटात उरण, पेण, पनवेल, खालापूर तालुक्यातील 70 स्पर्धकांनी  सहभाग नोंदवला.तर खुल्या गटात 21 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

   निबंध स्पर्धेचे परिक्षण हरिश्‍चंद्र ठाकूर सर, किशोर म्हात्रे सर,ए.बी तांडेल सर यांनी केले. तर समिती प्रमुख म्हणून वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे कार्यवाहक  मच्छिंद्र म्हात्रे यांनी काम पाहिले.  

  स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉक्टर रविंद्र गावंड, संदेश गावंड, सतीश पाटील, मिलिंद पाटील,  बी जे म्हात्रे,  मनोज गावंड, वशेणी शाळेचे शाळा प्रमुख अनंत पाटील, प्राध्यापक शिवहारी गावंड, कैलास पाटील, गणेश खोत, पूजन पाटील आणि मोरया स्पोर्टस् चे सदस्य  आदींनी विशेष  सहकार्य केले.

   या स्पर्धेला डॉक्टर शरद पाटील  विक्रोळी, सामाजिक कार्यकर्ते निलेश भाई म्हात्रे, उरण सामाजिक संघटनाचे पदाधिकारी संतोषजी पवार आदि मान्यवरांनी भेट दिली.

      लहान गटासाठी मी पाहिलेला किल्ला आणि खुल्या गटासाठी माझा तालुका माझ्या समस्या  हा विषय देण्यात आला.  दोन्ही गटातील प्रत्येकी पाच यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.  तसेच सहभागी  प्रत्येक स्पर्धकाला भेट वस्तू देण्यात आली.

     बक्षीस वितरणासाणी वशेणी गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच जीवन गावंड, सेवानिवृत्त शिक्षक पद्माकर धर्माची म्हात्रे व त्याच्या पत्नी शांताबाई म्हात्रे, वशेणी गाव अध्यक्ष  पुरुषोत्तम पाटील, हनुमान मंदिर कमिटी सदस्य  जे डी म्हात्रे, पागोटे शाळेचे पदवीधर शिक्षक  अनंत सदाशिव पाटील, ग्रामपंचायत सदस्य  गणपत ठाकूर तसेच बळीराम म्हात्रे, रमेश अर्जून पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

  छोटा गट - प्रथम क्रमांक - पूर्वजा परशुराम पाटील - गांधे, पेण द्वितीय क्रमांक - विदिशा बाळाराम भोपी - चौक, खालापूर ,तृतीय क्रमांक  - समित विश्‍वास पाटील - वशेणी, उरण

    उत्तेजनार्थ - रुद्र मिलिंद पाटील - मोठे भोम, उरण उत्तेजनार्थ  - सोनम दिलिप राऊत - पागोटे, उरण. खुला गट -प्रथम क्रमांक - अक्षय अनंत म्हात्रे - गोवठणे, उरणद्वितीय क्रमांक - सोनाली संजय पाटील - चौक, खालापूर,तृतीय क्रमांक - विठ्ठल ममताबादे - देऊळवाडी, उरण शहर ,उत्तेजनार्थ - मानसी रमेश पाटील - केळवणे, पनवेल,उत्तेजनार्थ - सागर भरत पाटील - वशेणी, उरण.