नवी दिल्ली 
नौदलाच्या एमआयजी 29 के या लढावू विमानाला पुन्हा एकदा अपघात झालाय. रविवारी सकाळी गोव्यामध्ये हा अपघात झाल्याची माहिती समोर येतेय. अपघात झाला तेव्हा या विमानानं प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतले होते.
10.30 च्या सुमारास या विमानाने हवेत झेप घेतली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे भारतीय नौदलाच्या प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अपघाता दरम्यान विमानाचा वैमानिक सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी ठरला. हा अपघात नेमका कसा घडला? याची चौकशी करण्यात येईल, असे नौदलाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
 

अवश्य वाचा