मुंबई 

गेटवे ऑफ इंडिया  येथे रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 63 जणांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत  प्रदान करण्यात आले. पंढरीनाथ पठारे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर युवराज खटके (अ‍ॅथलेटिक्स), बाळासाहेब आवारे (कुस्ती), नितीन खत्री (तायक्वांदो), जगदीश नानजकर (खोखो) आणि अनिल पवार (पॅराअ‍ॅथलेटिक्स) यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गुवाहाटी येथे नुकत्याच झालेल्या  खेलो इंडिय  क्रीडा स्पर्धेत 306 खेळाडूंनी पदके जिंकत राज्याला अग्रस्थान मिळवून दिले होते, त्यांचादेखील या सोहळ्यात गौरव करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्र्यांसह क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होती.

पुरस्कार सोहळ्याआधी सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मनोरंजन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले असताना शिवराज्याभिषेक सोहळ्याचे दृष्यच व्यासपीठावर साकारण्यात आले. अर्थातच भाषणादरम्यान या दिमाखदार सोहळ्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सुनील केदार यांचे विशेष कौतुकही केले.

 पठारे यांच्याकडून पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री निधीला बक्षीसरूपी मिळालेली तीन लाखांची रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दिली, असे शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार मिळालेले पंढरीनाथ पठारे यांनी सांगितले.

 

अवश्य वाचा

पेणमध्ये 13 गुन्हे दाखल