गोवे-कोलाड

 रोहा तालुक्यातील मौजे धानकान्हे येथे गावदेवी क्रीडा मंडळाच्या वतीने जिल्हा स्तरीय आमदार अनिकेत तटकरे कबड्डी चषक स्पर्धेत नवतरुण स्पोर्ट्स कारावी संघाच्या राज पाटील यांच्या रंगतदार चढाईबहादर खेळीने अखेर नवतरुण कारावी संघाला पराजीत करत आमदार चषकावर नाव कोरत अंतिम विजेतेपद संघाला पटकावून दिले,

उत्स्फुर्त प्रतिसाद लाभलेल्या या कबड्डी स्पर्धेत प्रमुख पाहुण्यांसह खांब देवकान्हे विभागातील क्रीडा प्रेमींची  मने सार्‍या जिल्ह्यातील खेळाडूंनी जिंकत धानकान्हे क्रीडांगणाची शोभा वाढवत टाळ्यांच्या गजरात खेळाडूंना प्रेक्षकांकडून प्रोत्साहन मिळत होते. उपांत्य फेरीत नवतरुण स्पोर्ट्स कारावी विरिद्ध जय हनुमान रसाळ तसेच नवतरुण करावी विरिद्ध जय हनुमान वाशी यांच्या मोठी चुरशीची व अटीतटीची लढत झाली या लढतीतून नवतरुण स्पोर्ट्स कारावी व नवतरुण कारावी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश करत दोन्ही कारावी विरुद्ध कारावी अशी मोठी अटीतटीची लढत असा रंगतदार सामना रशिकप्रेशकांना या मैदानावर आनंद देणारा ठरत अखेर नवतरुण स्पोर्ट्स कारावी संघांनी बाजी मारत आमदार चषकवर नाव कोरले तर द्वितीय क्रमांक नवतरुण कारावी तसेच तृतीय क्रमांक जय हनुमान रसाळ ,व चतुर्थ क्रमांक जय हनुमान वाशी संघांनी पटकावले असून  स्पर्धेत सर्वउत्कृष्ठ खेळाडू राज पाटील करावी,उत्कृष्ठ चढाई राहुल मोकळं कारावी, उत्कृष्ट पक्कड म्हणून प्रतीक भोईर रोहा तर क्रीडा रशिकप्रेशकांची पसंतीचा खेळाडू म्हणून रासळ संघाचा राहुल भोईर हा ठरला आहे,

रायगड जिल्ह्यातील बत्तीस संघांनी सहभाग नोंदवला आमदार अनिकेत तटकरे माजी आमदार  धैर्यशील पाटील,विजयराव मोरे,अर्जुन कचरे,शंकरराव म्हसकर,रामचंद्र चितळकर, तांडेल,मारुती खांडेकर सर, उपसरपंच सूरज कचरे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावदेवी धानकान्हेच्या दिवंगत खेळाडूंना या प्रसंगी क्रीडांगणावर श्रद्धांजली अपूर्ण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,

या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा व खेळाडूंचा सत्कार उप सरपंच सूरज कचरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले असून स्पर्धा यशस्वीत्यासाठी प्रसंगी विश्‍वास राऊत समीर तुपकर, सुदाम जाधव, नितेश राऊत, दिपेश कचरे, राकेश थळकर, जितीन साबळे, अनिल जाधव, मयुरेश माहित, नितीन कचरे, सचिन जाधव केतन जाधव लीलाधर राऊत गितेश शेलार अमोल जाधव सुनील बाईत उमेश कचरे प्रसाद गोसावी सह युवकांनी अथक परिश्रम घेतले              

रोहा तालुक्यातील धानकान्हे येथे रायगड जिल्हा स्तरीय आ अनिकेत तटकरे कबड्डी चषक  विजेता नवतरुण स्पोर्ट्स कारावी संघ दिसत आहे,