गडब 

पेण तालुक्यातील विरांगणा क्रिडा मंडळ काश्मिरे यांचे विद्यमाने घेण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरिय पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत वायुसुत ओढांगी संघाने विजेते पद मिळविले.

या स्पर्धेतील अंतिम सामना वायुसुत ओढांगी विरुध्द झुंझार कणे यांच्यात चुरशीचा झाला. वायुसुत ओढांगी संघाचा खेळांडु जितेश पाटील यांनी आक्रमक चढाया व पकडी केल्या तर निळेश पाटील आक्रमक चढाया करुन आपल्या संघाला विजय मिळवुन दिला झुंझार कणे संघाच्या बंटी बांधणकर यांने बहारदार चढाया केल्या.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक वायुसुत ओढांगी, व्दितीय क्रमांक झुझांर कणे, तृतीय क्रमांक ज्ञानेश्वर कोळवे, चतृर्थ क्रमांक नवयुवक खिडकी, सर्वोत्कृष्ट खेळांडु- जितेश पाटील ( ओढांगी ) चढाई - निलेश पाटील ( ओढांगी ) पकड - प्रतिक म्हात्रे ( कोळवे ) मॅन ऑफ द मॅच - बंटी बांधणकर ( कणे ) पब्लिक हिरो - निलेश डाकी ( खिडकी ) यांना विरगंणा क्रिडामंडळाचे अध्यक्ष शरद पाटील, सचिन पाटील आदि मान्यवराचे हस्ते पारितोषक देण्यात आले. या स्पर्धेवर निरिक्षक रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह संजय मोकल, पंच प्रमुख के. जी. म्हात्रे यांनी काम पाहीले.

 

अवश्य वाचा