मुरुड जंजिरा 

फणसाड अभयारण्यातील काही दिवसापूर्वीच  तीन ट्रॅप कॅमेरे अज्ञात व्यक्तीकडून लंपास करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी याबाबतची रीतसर तक्रार मुरुड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

हे कॅमेरे चोरीस गेल्याची तक्रार मुरुड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्ती विरोधात भादंवि कलम 379 हा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस.सी.लवटे हे अधिक तपास करीत आहेत.सदरील एका कॅमर्‍याची किंमत 20 हजार रुपये सांगण्यात आली असून तीन कॅमेर्‍याप्रमाणे 60 हजार रुपयांचे फणसाड अभयारण्य प्रशासनाचे नुकसान झाले आहे.

 

अवश्य वाचा