वाकण 

 संत निरंकारी सांप्रदायातील चौथे सद्गुरू बाबा हरदेव सिंगजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियान चे राजदूत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने 23 फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतात मेगा स्वच्छता अभियान सकाळी 8 ते दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान  राबविण्यात आले. या अभियानात सरकारी दवाखाने व सार्वजनिक ठिकाणी संत निरंकारी चॅरिटेबलच्या सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवून आपले कर्तव्य पार पडले. याच अनुषंगाने  रविवार दि. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात व नागोठण्यातील सार्वजनिक ठिकाणी सदस्यांनी स्वच्छत मोहीम राबविली.

या स्वच्छता अभियानची सुरूवात सकाळी 8 वाजता  नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातून करण्यात आली. यावेळी नागोठण्याचे सरपंच डॉ .मिलिंद धात्रक, नागोठणे  प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे, डॉ. स्नेहल कोळी,  प्रा.आ.केंद्रातील आरोग्य सहाय्यक यशवंत करजेकर, चॅरिटेबलचे रोहा शाखा मुखी हनुमंत चव्हाण, कोंडगाव शाखा मुखी दगडू धामणे, कोंडगाव सेवादल प्रमुख देविदास तेलंगे, रोहा शाखा प्रमुख मंगेश रटाटे, देविदास थवई, नामदेव म्हात्रे, वांगणी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विनायक तेलंगे, कोंडगाव तंटामुक्त अध्यक्ष राजू धामणे, प्रकाश भोकटे, राकेश बमुगडे, विजय धामणे, सुभाष वाघ, रमण शिर्के, नागोठणे ग्रामपंचायतीचे कर्मचारी पांडुरंग कोळी आदींसह सदस्य उपस्थित होते.

अवश्य वाचा