पाली / वाघोशी 

सन्मान सामाजिक विकास संस्था व ग्रामपंचायत वाघोशी यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोशी ग्रामपंचायत हद्दीतील महिलांना व मुलींना ब्युटीपार्लर चे मोफत प्रशिक्षण देण्यात आलं या मोफत प्रशिक्षणाचा कालावधी 30 दिवसाचा होता या तीस  दिवसाच्या कालावधीत 34 महिलांनी सहभाग दर्शवला व आपला ब्युटी पार्लरचा कोर्स पूर्ण केला.

सन्मान सामाजिक विकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आरती म्हसकरे व सचिव अमित गायकवाड यांनी तालुक्यांच्या ग्रामपंचायती यांच्या सहकार्याने व सन्मानच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्याचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू केले असून सर्व महिलांच्या हाताला काम देण्याचं काम संस्था करीत आहे येणार्‍या काळात सर्व महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम सन्मान सामाजिक विकास संस्था करणार आहे त्याला ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभणार आहे. वाघोशी येथे प्रशिक्षण घेतलेल्या  सर्व महिलांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत वाघोशी चे  माजी उपसरपंच उत्तमराव देशमुख सन्मानीय सदस्य दीपक पवार पोलीस पाटील संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे सचिव ग्रामसेवक व इतरही पदाधिकारी उपस्थित होते

 

 

अवश्य वाचा