सुकेळी 

नागोठणे जवळच असलेल्या ऐनघर ग्रामपंचायत हद्दीत सुकेळी परिसरातील कंपन्यांच्या समोरच अवैध पार्किंगमध्ये महामार्गावर ट्रेलरच्या लांबच लांब रांगा लागतात. याठिकाणी उभ्या असलेल्या ट्रेलरमुळे वाहतुकीस अडथळा होत असून अपघाची शक्यता बळावली आहे.

सुकेळी गावाच्या हद्दीमध्ये 5 ते 6 पोलादी पाईप उत्पादन करणार्‍या कंपन्या आहेत. यामध्ये जिंदाल सॉ, विभोर, महाराष्ट्र सिमलेस लि, हायड्रील, जिंदाल ड्रिलींग अशा कंपन्यांच्या समावेश आहे. या कंपन्यातील पोलादी पाईप किंवा कॉईलची वाहतुक करण्यासाठी असणार्‍या ट्रेलरच्या या मार्गावर लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात  अपघात घडत आहेत. तसेच मुंबई -गोवा मार्गावरील वाहतुकीसाठीदेखिल मोठा अडथळा निर्माण होत आहे.

या परिसरामध्ये गेल्या काही वर्षामध्ये अशा प्रकारचे अपघात बरेच वेळा घडलेले आहेत. लोखंडी काँईल किंवा पाईप असलेल्या ट्रेलरमुळे बाईकस्वारांच्या अपघातात देखिल मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे महामार्गावरील रस्त्यावर अवैध पार्किंगमध्ये लागलेल्या ट्रेलरच्या लांबच लांब रांगाकडे महामार्ग वाहतुक नियंत्रण विभाग याकडे दुर्लक्ष करित असल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षांमध्ये याच उभ्या असलेल्या ट्रेलरमुळे बरेच अपघात झाले आहेत व त्यात काही जणांना आपला जीव देखिल गमवावा लागला होता. अशा अवैध पार्किंगमध्ये ऊभे करणा-या ट्रेलर चालकांवर महामार्ग पोलिस व वाहतुक विभागामार्फंत कारवाई करण्यात यावी अशी मागणी ऐनघर विभागातुन व वाहनचालकांतुन होत आहे.

 

अवश्य वाचा