म्हसळा 

सालाबादप्रमाणे राजस्थान समाज मंडळाच्या वतीने म्हसळा येथील शिवमंदिरात महाशिवरात्री उत्सव कार्यक्रम दिनांक21 फेब्रुवारी रोजी मोठया उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.अभ्यंगस्नान,आरती,तिर्थप्रासाद,भजनसंध्या हे कार्यक्रम संपल्यावर दुसर्‍या दिवशी मंडळाने हजारो भक्तांना महाप्रसादाचा लाभ दिला.म्हसळा निवासी राजस्थान समाज मंडळ हा पूर्णपणे व्यावसायिक आहे.हा समाज मंडळ श्री गौरीशंकराचे निस्सीम भक्त आहेत.श्रद्धेने दर वर्षी शिवरात्रीउत्सवात शिवमंदिरात गेली चारपाच वर्षे म्हसळा येथील भक्तांना महाप्रसादाचा लाभ देतात.या वर्षीही आयोजित कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहुन शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.समाजतील लहान थोरांनी सेवा भावाने आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला होता आणि कार्यक्रम यशस्वी पार पाडला.