पनवेल  

चाळीत राहणार्‍या महिलांचा विश्‍वास संपादन करून दोन अनोळखी महिलांनी या महिलांकडून सोन्याच्या दागिन्यांसह मोबाईल काढून घेऊन त्या पसार झाल्याची घटना पनवेल शहराजवळील वडघर येथे घडली आहे.

वडघर येथील जाधव यांच्या चाळीत राहणार्‍या मनिषा सोनावणे सह त्यांच्या बाजूला राहणार्‍या इतर काही महिलांची चार दिवसांपूर्वी दोन अनोळखी महिलांनी भेट घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधत त्यांच्याकडून प्रथम जुनी भांडी घेऊन गेल्या व दुसर्‍या दिवशी त्यांना नवीन भांडी आणून दिल्या व त्यानंतर याच महिलांकडून जुन्या चांदीच्या वस्तू घेऊन गेल्या व पुन्हा त्यांना चांदीच्या वस्तू आणून नवीन स्टिलचे डबे प्रत्येकीला दिले. यावेळी त्यांनी या महिलांकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली व दागिन्यांसह रोखरक्कम व इतर भेटवस्तू देते तेच मोबाईल दिल्यास त्याची दुप्पट किंमत देऊ असे बोलून या महिलांकडून वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने व एक मोबाईल असा मिळून जवळपास 70 हजारांचा ऐवज हुशारीने काढून घेऊन त्या दोघी महिला तेथून निघून गेल्या 2 दिवस वाट बघूनही त्या परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याची या महिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी सदर दोन ्अनोळखी महिलांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.