पनवेल 

तालुक्यातील तळोजा गावातील एका घराला रविवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली असून सुदैवाने जीवितहानी झाली नसून वित्तहानी झाल्याचे दिसून आले आहे.

तळोजा गावातील एका घराला रविवारी सकाळी अचानकपणे आग लागल्याचे बघताच ग्रामस्थांनी तेथे धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. तर तातडीने अग्निशमन दलाला त्याठिकाणी पाचारण करण्यात आले व त्यांनी सदर आग विझवली. या आगीत दैवाने जीवितहानी झाली नसून वित्तहानी झाल्याचे दिसून आले आहे. सदर आग ही शॉट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 

अवश्य वाचा