दापोली

 कै.संदीप विठ्ठल सुवरे यांचे स्मरणार्थ श्रीराम क्रीडा मंडळ प्रभुआळी आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्रीभैरवनाथ मुरुड संघाने विजेतेपद तर अमरभारत टाळसुरे संघाने उपविजेतेपद पटकावले. तीन दिवस झालेल्या या स्पर्धेमध्ये एकूण 24 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन डॉ.कुणाल मेहता यांच्या हस्ते झाले. अंतिम सामना बरोबरीत संपल्यानंतर पाच-पाच चढाईमध्ये श्रीभैरवनाथ मुरुड संघाने बाजी मारली. विजेत्या मुरुड संघास रोख रक्कम 11 हजार 111 व आकर्षक ढाल, उपविजेत्या संघास रोख रक्कम 7 हजार 777 व आकर्षक ढाल मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.अमित कदम यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्रीराम क्रीडा मंडळ प्रभुआळीचे सर्व पदाधिकारी व प्रभुआळीतील सर्व कबड्डीप्रेमींनी मेहनत घेतली.

 

अवश्य वाचा