मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करून दिलं. सरकारचं काम व्यवस्थित सुरू आहे. सर्व नीट चालू आहे. त्यामुळे आता मी लांब झालो. या सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही, असं सांगतानाच करतानाच काही मदत लागली, माझी गरज पडली तर उभं राह्यचं. यापेक्षा सरकारशी काहीही संबंध ठेवायचा नाही, असा निर्णय मी घेतला आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केलं.

 एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी ही भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी राज्य सरकार पाच वर्षे टिकेल याची शाश्‍वतीही दिली. सरकारबद्दल मला स्वतःला शंका वाटत नाही. महाविकास आघाडीचं सरकार हे संमिश्र सरकार असून हे सरकार पाच वर्षे चालेल. या सरकारचे नेतृत्व ज्यांच्या हातात आहे, ते सगळ्यांना घेऊन चालणारे आहेत आणि दुसर्‍यांच्या कामात ते हस्तक्षेप करत नाहीत. समन्वय समिती मिळून आम्ही एकत्र प्रश्‍न सोडवतो. त्यामुळे सरकार पाच वर्षे चालेल यात काही शंका नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. जुन्या सरकारचे काही निर्णय बदलले, त्याचा राज्यावर विशेष परिणाम होईल असं वाटत नाही, असंही ते म्हणाले.

अवश्य वाचा