मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येला जाणार आहेत. येत्या 7 मार्च रोजी उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत अयोध्येला जाणार असून प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज ट्विटरद्वारे दिली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याची सविस्तर माहिती दिली आहे. येत्या 7 मार्च रोजी उद्धव ठाकरे असंख्य शिवसैनिकांसह अयोध्येला जाणार आहेत. 7 मार्च रोजी अयोध्येत दुपारी श्रीरामाचे दर्शन घेतील. त्यानंतर संध्याकाळी शरयू नदीच्या तीरावर महाआरती करतील. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्यात सामील व्हा, असं आवाहनही राऊत यांनी केलं आहे. कालच मुख्यमंत्री ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज राऊत यांनी लगेचच ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याचं ट्विट करून भाजपला धक्का दिला आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

 

अवश्य वाचा