पेण
 पेण तालुक्यातील डोलवी गावाच्या हद्दीत जे.एस.डब्ल्यु कंपनीचे अलिबाग गेटसमोर उभ्या असलेल्या बसच्या पाठीमागून रस्ता ओलांडत असताना पादचारी महिलेला समोरून कंपनीच्या गेटमध्ये येणार्‍या भरधाव ट्रेलरची धडक बसून पादचारी महिला जखमी झाली. शुक्रवारी दुपारी 3 च्या दरम्यान हा अपघात झाला.
अलिबाग गेटमध्ये एमएच./06/ए.सी/7663 क्रमांकाचा ट्रेलर भरधाव वेगात जात असताना सदर ट्रेलरची रस्ता ओलांडणार्‍या पादचारी महिलेला ठोकर बसून सदर ट्रेलर पुढे उभ्या असलेल्या बसला धडकून अपघात झाला. या अपघातात पादचारी महिला जखमी होऊन बसचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार दीपक शिंदे हे करीत आहेत.
 
 
 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध