पेण 

पेण तालुक्यातील मुंढाणी गावच्या ग्रामस्थाने  विकास कामात अडथळा करणार्‍या समाज कंटकांनविरुध्द कारवाई व्हावी म्हणून लेखी स्वरुपात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सी.पी.पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.

या निवेदनामध्ये मुढांणी गावच्या 54 ग्रामस्थांनी स्वाक्षरी करुन गावच्या विकास कामात अडथळा करण्या विरुध्द कारवाइ करण्यासाठी गटविकारस अधिकार्‍यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली आहे.  मौजे नवे मुढांणी येथे चौदावा वित्त आयोग्यातुन दोन लाख खर्च करुन ठेकेदाराने योग्य प्रकारे सभागृहाचे बांधकाम केले आहे. मात्र बाहेरील गावचे समाजकंटक वसंत मोकल,भास्कर म्हात्रे, केशव कुथे, जानुु कुथे, मनोहर घासे हे  सभागृहाचे काम झाले असताना काम झाले नसल्याचे चुकीच्या वावढया उठवत आहेत. तशाप्रकारे वर्तमान पत्रात खोटया जाहिराती देखील छापुन आणत आहेत  वेळोवेळी सरपंच व शासकीय यंत्रणेवर दबाव आणून विरोध करत आहेत, तरी अशा समाज कंटकांनविरोध कारवाई करावी वसंत मोकल हे हया अगोदर देखील महावतिरण कंपनीच्या देखील अधिकार्‍यांना विज चोरी प्रकरणात मारहाण केल्याचे गुन्हा केलेला आहे तरी आमच्या विकास कामात अडथळा आणत असल्याने या पाचही जणांवर   कारवाई व्हावी जर ह या व्यक्ती वारंवार असच करत राहील्यास आमच्या गावाचा विकास होणार नाही असे यामध्ये सुचित करण्यात आलेले आहे.हेच  निवेदन जिल्हाअधिकारी रायगड,उपविभागीय अधिकारी पेण,पोलीस अधिक्षक रायगड,उपविभागीय अभियत्ता बांधकाम पोलीस निरिक्षक नागोठणे यांनाही दिलेले आहे