रोहा अष्टमी

रोहा तालुक्यातील ग्रामीण भागामधील युवक युवतींना केंद्रसरकारच्या दिनदयाळ योजनेअंतर्गत किमान कौशल्य प्रशिक्षण संधी उपलब्ध करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या  ग्रामविकास मंत्रालय व ग्रामीण जिवन्नोत्ती विभाग महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने व एड्युलाईट लर्निंग सर्व्हिसेस प्रा. ली. यांचे माध्यमातून युवकांना किमान कौशल्य देत त्यांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होणे साठी हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

रोहा तालुक्यातील सोनखार न्हावे येथील श्रीराम मंदिरामध्ये रविवार 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजले पासून इच्छुक प्रशिक्षणार्थिंच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. याचा तालुक्यातील जास्तीतजास्त युवक युवतींना लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रकांत चौलकर यांनी केले आहे.  या योजनेचा लाभ ग्रामपंचायत हद्दीत राहणार्‍या युवक युवतींना घेता येणार आहे. इयत्ता बारावी पास असणारे 18 ते 35 वयोगटातील युवक युवती या साठी अर्ज करु शकतात. या प्रशिक्षणाचा लाभ घेणारा मागासवर्गीय असल्यास त्याचे जातीचे प्रमाणपत्र , दारिद्र्य रेषेखालील असल्यास रेशनकार्ड ची रंगीत झेरॉक्स , आई बचत गट सदस्य किंवा जॉब कार्ड , ग्रामपंचायतीचा दारिद्र्य रेषेखालचा दाखला यापैकी कोणताही एक पुरावा आपल्या अर्जासोबत जोडावा. 23 फेब्रुवारी सोनखार येथे होणार्‍या प्रशिक्षण नोंदणी साठी तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा व यासंबंधित अधिक चौकशी साठी 9422584853 या दूरध्वनी वर संपर्क साधावा असे आवाहन चंद्रकांत चौलकर यांनी केले आहे.