कोर्लई

मुरुड तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील भोईघर ग्रामपंचायत हद्दीतील काजुवाडी येथील शेतकरी रामदास पांडुरंग पाष्टे यांनी परिस्थितीवर मात करून आपल्या कडे असलेल्या शेतात नऊगुंठे क्षेत्रात फुलांची शेती फुलवून स्वयंरोजगाराची यशस्वी वाट शोधली असल्याने त्यांंचे कौतुक होत आहे.

रामदास पाष्टे यांनी फणसाड धरणाच्या जवळ काजुवाडीतील आपल्या शेतातील नऊगुंठे क्षेत्रात तीन गुंठ्यांत शेवंतीची तर तीन गुंठ्यांत झेंडूची(गोंड्याची) फुलांची व तीन गुंठे जमिनीत मका पिकवला.त्यांनी सन.2016 मधे अलिबाग-वाडगांव येथील नातेवाईक महादेव पाष्टे यांच्या कडून शेवंतीची तीनशे रोपे आणून लावली.सन.2017 मधे नंतर एक गुंठ्यांत रोपे लावली हीच रोपे जागेत तयार करून यंदा तीन गुंठ्यांत 1200 रोपे लावण्यात आली.या रोपांची लागवड सरासरी आँगष्ट महिन्यात केली जाते व डिसेंबर महिन्यात उत्पन्न मिळते. परंतु यंदा पाऊस लांबल्याने उशिरा लागवड करुनही चांगले उत्पादन मिळविले आहे. त्यांनी तीन गुंठे जागेत शेवंतीची व तीन गुंठे जागेत झेंडूची (गोंडयाची) रोपे लावली उरलेल्या तीन गुंठे जागेत मक्याचे पीक तर अर्ध्या गुंठ्यांत पांढरा कांदा (उल) लावली आहे. दोन महिन्यानंतर त्यांना दिवसाकाठी आज हजाराचा रोजगार मिळाला आहे.