खोपोली  

मुंबई - पूणे एक्सप्रेस वे वरील खोपोली हद्दीतील फूङमॉल येथे बसमधून प्रवांशाच्या किंमती सामनावर ङल्ला मारणार्‍या अमोल शिवाजी ढवळे याच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकङून सुमारे तीन लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. फूङमॉल थांबणार्‍या बसमधून प्रवांशाच्या किंमती सामानाची चोरी होण्याच्या घटना सातत्याने घङत होत्या. रायगङ पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दखल घेत आरोपीला जेरबंद करण्याच्या सूचना खोपोली पोलीसांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरिक्षक धनाजी क्षीरसागर ,पोलीस उपनिरिक्षक अमोल वळसंग,पीलीस हवालदार राजेंद्र पाटील ,वसंत शिंदे ,पोलीस शिपाई प्रदीप खरात ,प्रवीण भालेराव,कादर तांबोळी,दत्तात्रय नालुके यांच्या पथकाने सापळा रचला होता. सीसी टिव्ही फुटेजच्या आधारे संशयित इसम आढळला असता पोलीसांनी त्याला ताब्यात घेवून चौकशी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.