पनवेल

 दरवर्षीप्रमाणे आजही महाशिवरात्रीचे औचित्य साधून हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध सिनेअभिनेते हृतिक रोशन व त्यांचे वडील राकेश रोशन यांनी पनवेल जवळील आपटे फाटा येथेे त्यांच्या आजोबांनी बांधलेल्या शिवमंदिराचे दर्शन सहकुटूंब घेतले.

दरवर्षी रोशन कुटूंबिय महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचे आजोबा जे. ओमप्रकाश यांनी पनवेल जवळील आपटे फाटा येथे बांधलेल्या शिवमंदिरात दर्शन व विधीवत पूजा करण्यासाठी येत असतात. आजही हृतिक रोशन, राकेश रोशन तसेच हृतिक रोशनची मुले आणि इतर कुटूंबिय एकत्र येऊन शिवमंदिरात दर्शन घेतले. विधीवत पूजाअर्चा केली. त्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. हृतिक रोशन टि-शर्ट, जीन्स व कॅप परिधान करून आला होता. तर राकेश रोशन यांनी सफेद शर्ट अशा साध्या पेहराव्यात आले होते. या सर्वांनी उपस्थितांना हात उंचावून नमस्कार केला व नंतर मुंबई बाजूकडे ते रवाना झाले.