आगरदांडा 

  मुरूड शहरातील भोगेश्‍वर पाखाडी येथील शिवमंदिरात व टेकडीवर असणार्‍या क्षेत्रपाल मंदिरात बम बम भोले’ आणि ’हर हर महादेव’च्या गजरात शिवभक्त आपल्या आराध्य दैवताचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने मंदिरात पोहचले होते. ठिकठिकाणच्या मंदिरात  भाविकांची प्रचंड लांबच लांब रांगा दिसत होत्या.शिवपिंडीवर भक्तांकडून दुग्धाभिषेक केला जात आहे. शिवभक्तांना दर्शन सहज आणि सुलभ व्हावं यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून सुरक्षा रक्षक तसेच स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते.

   मुरुड शहरातील भोगेश्‍वर मंदिर त्याच प्रमाणे श्री क्षेत्रपाल ,एकदरा येथील शिवमंदिरात मोठी गर्दी दिसून आली.त्याच प्रमाणे आज रताळे विकत घेण्यासाठी बाजारात मोठी गर्दी दिसून आली.या दिवशी रताळ्याची भाजी,खीर बनवण्याची परंपरा असल्याने मुरुड सह ग्रामीण भागातील असंख्य लोकांनी रताळे खरेदी करण्यावर मोठी गर्दी दिसून आली.

 भगवान शंकराच्या मंदिर मन्त्रोउपचाराने घोषित होऊन सर्व वातावरण भक्तिमय झाले होते.काही देवळांमध्ये कीर्तन सुद्धा ठेवण्यात आले होते.सर्व नागरिक मोठ्या भक्तिती मध्ये तल्लीन होऊन भगवान शंकराची पार्थना करताना दिसून आले.