देश पारतंत्र्यात असतानाच विविध आंतरराष्ट्रीय सन्मानांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. ‘इन्स्टिट्यूटर ऑफ केमिस्ट ऑफ ग्रेट ब्रिटन’ या जगविख्यात संस्थेने त्यांना सभासदत्व दिले असे ते पहिले भारतीय. दुसर्‍या महायुद्धाच्या कळात व्हाईसरॉयने त्यांची संशोधन खात्याच्या प्रमुखपदी नेमणूक केली. 1939 साली ब्रिटिश सरकारच्या ‘बोई ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’ या संस्थेचे आद्यसंचालक होण्याचा मान त्यांना मिळाला. इंग्रजांचे राज्य असतानाच ओ.बी.इव सर ही पदवी मिळाली. लंडनच्या रॉयल सोसायटीनेही त्यांना सभासद करुन घेतले. 1930 च्या दशकात एक प्रवासी शिष्यवृत्ती मिळवून जगातील वेगवेगळ्या देशातील वैज्ञानिकांशी त्यांचा परिचिय झाला. त्यात मादाम क्युरी, पॉल लगोव्हिन, डॉ. डौनान इ.शी भेट झाली.

सहसा आपल्या देशात गुणवंतांची कदर होत नाही. विशेषत: देश पारतंत्र्यात असताना जग त्यांना डोक्यावर घेऊन नाचत होते, पण देश स्वतंत्र झाल्यावर मात्र त्यांच्या त्यागाला कोणतीच किंमत उरली नाही, हे डॉ. खानखोजे व डॉ. खोराना यांच्या उदाहणावरुन दिसले. पण, ते मात्र अपवाद ठरले, हे आपल्या देशाचे सुदैव. पंडित नेहरुंना त्यांच्यात असणार्‍या भिन्न गुणांची पारख होती आणि तो विज्ञानाच्या इतिहासातील ऐेतिहासिक क्षण 1951 साली उजाडला. पंडित नेहरंनी वैज्ञानिक संशोधन व साधनसामुग्री या खात्याची जबाबदारी ज्यांच्यावर टाकली, त्या शांतीस्वरूप भटनागर यांचा जन्म 21 फेब्रुवारी,1894 रोजी झाला. पंजाबातील (पाकिस्तान) शाहपूर जिल्ह्यतील भेडा या गावी ते अवघे आठ महिन्यांचे असताना पितृछत्राला पारखे झाले. तेव्हा त्यांची आई आपल्या वडिलांकडे या तान्ह्या बाळाला घेऊन आली. त्यांचे आजोबा मुनशी प्यारेलाल जे त्या काळातले इंजिनिअर होते, त्यांनी आपल्या नातवाला देशासाठी घडवला तो शास्त्रज्ञ म्हणून.

लाहोर येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर ‘पाण्याच्या पृष्ठभागावर विरलेल्या वायूचा परिणाम’ या शोध प्रबंधाच्या कामगिरीवर 1918 साली लंडन कॉलेजातून ‘कलिक रसायनशास्त्रज्ञ’ या विषयात संशोधन केल्याने ते जगविख्यात झाले. देशभक्त आणि गुणभक्त असणार्‍या पंडित मालवीयांची काकदृष्टी त्यांच्यावर पडलीच. त्यांनी बनारस विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्रोफेसर म्हणून त्यांची नियुक्ती केली. दुसर्‍या महायुद्वाच्या काळात विषारी वायूपासून लोकांचा बचाव व्हावा यासाठी विषारी वायूप्रतिबंधक अशा वस्तूंचा शोध लावला. अपघातात गाडीच्या काचा फुटू नयेत म्हणून ‘एअर फोन सोल्युशन’ तयार केले. आज जे प्लॅस्टिकचे युग सबंध जगभर अवतरले त्याचे मूळ जनक आपले शांतिस्वरूपजी. त्यांनी मिश्र पद्धतीचे प्लॅस्टिक तयार केले. तेल, लाख, खते, पेट्रोलियमयुक्त पदार्थांवरही त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले. ‘लोहचुंबक आणि अणू-परमाणूंच्या रचनेशी त्याचा संबंध’ याविषयीचे त्यांचे संशोधन जागतिक दर्जाचे होते. आपल्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे म्हणजे, डॉ. भटनागर हे स्वतंत्र भारताचे पहिले विज्ञान संघटक होते.

1951 नंतर वैज्ञानिक संशोधन व नैसर्गिक साधनसामुग्री या खात्याचे चिटणीस म्हणून सूत्रे हाती घेतल्यावर त्यांच्या संशोधन कार्याचा दुसरा टप्पा सुरु होतो. रंग, औषधे, स्टेनलेस स्टील, ग्रॅफाइट,औद्योगिक रसायने इ. विषयांवर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले. देशाविदेशात दौरे विशेषतः रशियाच्या अणुकारखान्याला भेट देऊन भारतातील अणुकारखान्यात आवश्यक त्या सुधारणा केल्या. शक्यतो साहित्यिक हा संशोधक होऊ शकत नाही आणि संशोधक हा साहित्यिक होऊ शकत नाही. पण, डॉ. भटनागर याला अपवाद आहेत. उर्दूत विद्युतशक्तीवर प्रबंध, ‘लाजवंती’ हा काव्यसंग्रह तसेच शास्त्रीय लेख लिहून वैज्ञानिक साहित्य आपल्या लेखणीने सजवले. त्यांच्या कर्तृत्वाची दखल भारत सरकारने घेतली. 1954 मध्ये डॉ. भटनागर यांना ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार मिळाला.

सतत काम करत राहणे ही त्यांची खासियत. 1 जानेवारी, 1955 रोजी कामातच व्यग्र असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि आपणामधून त्यांना ओढून नेले. 

अवश्य वाचा