नागाव 

अलिबाग तालुक्यातील नागाव  ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दर्यावर्दी मित्र परिवार नागाव बंदर  तर्फे जिल्हास्तरिय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  स्पर्धेत अटीतटीच्या अंतिम लढतीत  अलिबाग तालुक्यीतल पांडबादेवी रायवाडी संघ अजिंक्य ठरला आहे. या स्पर्धेचे उद्दघाटन नागाव ग्रामपंचायतीचे  सरपंच निखील मयेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणार्‍या अंतिम लढतीत कोण विजयी होणार याचीच चर्चा रंगली होती. प्रत्येकाचे लक्ष अंतिम लढतीच्या शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवण्याच्यी किमया या स्पर्धेच्यावेळी झाली. पांडबादेवी रायवाडी व रोहा येथील जय बजरंग रोहा यांच्यातील अंतिम लढत चुरशीची झाली. या लढतीत  जय बजरंग रोहा संघाला दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेत जिल्ह्यातील निमंत्रित 16 संघानी सहभाग घेतला होता. त्यामध्ये तृतीय व चतुर्थ क्रमांक अनुक्रमे चिंतामणी बंदर नागाव व  वायशेत या संघानी पटकाविला. या स्पर्धेतील रायवाडी संघाचा केदार लाल यीला सर्वोकृष्ट खेळाडू ठरला. उत्कृष्ट चढाई  रोहा येथील जय बजरंग रोहा संघातील राकेश गायकवाड  याने पटकाविली.  तर सर्वोकृष्ट पकडाचे बक्षिस नितीन कामाने चिंतामणी नागाव संघ व तेजस पडवळ  रायवाडी संघ यांना विभागून देण्यात आले. याशिवाय पब्लीक हीरो वायशेत येथील कल्याण हाके याला देण्यात आले.