मुंबई  

को-ऑपरेटिव्ह बँक एम्ल्पॉईज युनियन, मुंबई या आपल्या संघटनेचे 60 वर्धापन दिनानिमित्त आंतर-सहकारी बँकेची मानाची, प्रतिष्ठेची कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा 2020 मोठ्या दिमाखात शनिवार दिनांक 29 फेब्रुवारी, 2020 ते 1 मार्च, 2020 या कालावधीत को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे कार्यालय, 81/83, शालिनी पॅलेस, भवानी शंकर रोड, दादर (प.), मुंबई - 400 028 येथे आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबईचे अध्यक्ष माननीय खासदार आनंद अडसूळ, कार्याध्यक्ष सुनिल साळवी व सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळविण्यात येणार आहे.

को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबईच्या विद्यमाने खेळविण्यात येणारी ही स्पर्धा पुरुष ऐकरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी अशा चार गटात खेळविली जाणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये मुंबई व ठाणे या शहरातील सहकारी बँकांमधील 350 कॅरम पटू आणि अधिकारी भाग घेणार आहेत. सदर स्पर्धा अखिल भारतीय कॅरम फेडरेशनच्या नवीन प्रचलित नियमावलीनुसार खेळविली जाईल. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपली कंबर कसली असून कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार रेगे, दत्ता कळंबे, हाशम धामसकर, प्रकाश वाघमारे, यदुवीर पुत्रन, नारायण बोरुडे, मनोहर दरेकर, राजेश कांबळे, नितीन गवांदे, जनार्दन मोरे व इतर कार्यकर्ते विशेष मेहनत घेत आहेत.

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रुपये पन्नास हजार रुपयांची पारितोषिके व चषक देण्यात येतील. तसेच ब्रेक टू फिनिश व ब्लॅक टू फिनिश नोंदविणार्‍या खेळाडूंना रोख पारितोषिके देण्यात येतील. या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कॅरम पंच परविंदर सिंग यांची नेमणूक करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय कॅरम पंच जनार्धन संगम या स्पर्धेचे तांत्रिक संचालक म्हणून काम पाहतील. इच्छुक सहकारी बँकेच्या स्पर्धकांनी कॅरम व बुद्धिबळ या स्पर्धांच्या प्रवेशिकांसाठी स्पर्धेचे सचिव यांच्याकडे सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2020 रोजी रात्री 9.00 वाजेपर्यंत नंदकुमार रेगे 91 9802 55385, प्रकाश वाघमारे 91 9322250926 आणि जनार्दन मोरे 91 99692 65538 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन मंडळानी केले आहे.