यंदाच्या वर्षी जगातील क्रिकेट प्रेमीना वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा बघण्याचा मडबल धमाकाफ चालून आला आहे. आजपासून ऑस्ट्रेलियामध्ये महिलांच्या टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होत आहे. सलामीलाच भारताची गाठ पडणार आहे ती यजमान तसेच टी20 वर्ल्डकप चार वेळा जिंकणार्या ऑस्ट्रेलिया समवेत. भारतीय महिला संघामध्ये जगज्जेते होण्याची निश्‍चित धमक आहे यात वादच नाही. पण भारतीय महिला टीमला उणीव भासणार आहे ती अनुभवी फलंदाज तसेच माजी कर्णधार मिताली राज आणि हरहुन्नर अष्टपैलू झुलन गोस्वामी यांची ! त्यांची मोकळी भरणे अशक्य असले तरी भारतीय टीम मध्ये नव्याने दाखल झालेल्या खेळांडू सुध्दा अत्यंत प्रतिभावान आहेत, यात वादच नाही. तीन वर्षापूर्वी इंग्लंड मध्ये झालेल्या वन-डे वर्ल्डकप मध्ये भारतीय टीमचे विजेतेपद थोडक्यात हुकले होते, त्याच्या कटू आठवणी आजही भारतीय महिलांच्या मनात सलत राहिल्या आहेत. त्या उपविजेतेपदानंतर भारतीय टीम मध्ये आमूलाग्र बदल झाले. भारताचा माजी कसोटीपटू सलामीवीर बुक्रेरी रामन याची महिला संघाच्या प्रशिक्षकपदी वर्णी लागली. त्यानंतर प्रत्येक सामन्यागणिक टीमची प्रगती सुधारत गेली. भारतीय महिला टीमने सकारात्मक खेळण्यावर भर दिला म्हणूनच कदाचित जगज्जेते ठरलो तर ती भारतासाठी खूप मोठी गोष्ट ठरेल असा आत्मविश्‍वास भारतीय महिला संघाची कर्णधार हरमन प्रीतने व्यक्त केला आहे. दोन-तीन वर्षापूर्वी भारतीय महिला संघातील सर्वात तरुण खेळाडू होते,  आता नव्या मुलींमध्ये मीच सर्वात अनुभवी आहे. तसे असले तरी संघातील प्रत्येक खेळाडूला जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे असेही हरमन म्हणाली. भारतीय महिला टीमसाठी टी-20 वर्ल्डकप मधील प्रत्येक सामना अत्यंत महत्वाचा आहे. ऑस्ट्रेलिया समवेत या गटात भारताला बांगालदेश, श्रीलंका, न्युझीलंड यांच्याशी लढत होणार आहे. सलामीचा सामना आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असेल. ऑस्ट्रेलियाची टीप जागतीक महिला क्रिकेट मध्ये अव्वल स्थानावर आहे. टी.20 मध्ये त्यांच्या पुरुष संघाला टी-20 चे वर्ल्डकपचे विजेतेपद आजपर्यंत कधीच मिळविता आहे नहाी. मात्र ऑस्ट्रेलियाच्या महिला टीमने विजयाचा चौकार मारुन यंदाच्या वर्षी विजयाचे मपंचकफ करण्याचा इरादा केला आहे. भारता समवेत इंग्लंड, द.आफ्रिका, वेस्ट इंडिज च्या महिला सुध्दा टी-20 महिला वर्ल्डकपच्या प्रबळ दावेदारांच्या शर्यतीत आहेत यात शंकाच नाही.

भारतीय महिला टीम कागदावर जरी कमी अनुभवी तसेच नवोदित दिसत असली तरी सुध्दा मैदानात या महिला खेळाडूंचा नुर काही वेगळाच दिसून येतो. कर्णधार  हरमनप्रीत ही तडाखेबाज फलंदाज म्हणून गणली जाते. तीन वर्षापूर्वी इंग्लंड मध्ये झालेल्या वन-डे वर्ल्डकप मध्ये उपांत्य फेरीच्या लढतीत हरमनने अ‍ॅास्ट्रेलिया विरुध्द जी तडाखेबंद शतकी खेळी केली होती ती अक्षरश: डोळ्यांचे पारणे फेडणरी होती. हरमन प्रीतच्या झंझावता समोर ऑस्ट्रेलियाच्या महिला गोलंदाजांना अखेर नतमस्तक व्हावे लागले होते. पण यावेळी हरमन प्रीतवर संघाच्या कर्णधापदाची मोठी धुरा असल्याने तिची कामगिरी कशी होईल याकडेच सार्या भारतीय क्रीडा प्रेमींचे लक्ष लागले आहे. भारतीय महिलाा टीम मध्ये आणखी एक ममॅच विनरफ फलंदाज आहे ती म्हणजे स्मृती संघाना ! स्मृतीला ऑस्ट्रेलियातील विकेटवर खेळण्याच अनुभव गाठीशी आहे. नुकत्याच झालेल्या महिला बीग बॅश स्पर्धेत स्मृतीने एका संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. तिच्या फलंदाजीत सेहवाग सारखा आक्रमकपणा आहे फक्त स्मृतीने आपल्या संयम ढळू न  देता वीस षटके पूर्णपणे खेळून काढली तर भारताचा विजय निश्‍चित असेल यात शंकाच नाही. स्मृतीची सलामी जोडीदार जोमिमा रॉड्रीक्स सुध्दा जबरदस्त फॅार्ममध्ये आहे. जेभिमा सुध्दा एका धोकादायक फलंदाज म्हणून जागतिक माहिला क्रिकेट मध्ये गणली जाते. जेमिमाचा हा पहिलाच टी-20 वर्ल्डकप असल्याने तिच्यावर थोडेसे दडपण असणे सहाजिकच आहे. तरी सुध्दा तिने आपल्या आक्रमक खेळाला मुरड न घालता खेळ केला तर तो टीमसाठी जास्त उपयुक्त ठरेल असे मत संघाचे प्रशिक्षक रामन यांनी व्यक्त केले आहे. दिप्ती शर्मा ही या टीम मधील गुणी अष्टपैलू खेळाडू आहे. तिच्या ऑफास्पीन चा फिरकी मारा अत्यंत घातक असतो. ती मपार्टनरशिपफ ब्रेकर गोलंदाज म्हणून ओळखली जाते. भारताच्या विजयात नेहमीच सिंहाचा वाटा असणरी लेकस्पिन फिरकी गोलंदाज पुनम यादव, डावखुी फिरकी गोलंदाजीराधा, तसेच अष्टपैलू खेळाडू शिखा पांडे असा भारतीय महिलांचा तरुण, दमदार रक्ताचा संघ टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत जगज्जेता होण्यासाठी निश्‍चित उतरला आहे. भारतातील तमाम क्रीडा प्रेमींना या टी-20 वर्ल्डकपची उत्सुकता आहे. मग बघता काय आज दुपारी दिड वाजता भारत-ऑस्ट्रेलिया लढत पाहाण्यासाठी टी.व्ही समोर बसा आणि मनमुराद आनंद लुटा ! मभारतीय महिल टीमला मऑल द बेस्टफ

 

अवश्य वाचा