धाटाव 

रोहा कोलाड रस्त्यावर  उभ्या असलेल्या अवजड वाहनांचा या ठिकाणी रहदारीला चांगलाच अडथळा होत आहे.मात्र या अडथळ्यामुळे रस्त्यावरील पादचारीवर्गाला आता डोकेदुखी होत असल्याने अपघाताचा धोका मात्र कायम असल्याचे पहावयास मिळत आहे.मात्र रस्त्यालगत उभ्या असलेल्या या वाहनांमुळे सुरक्षेचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे.

धाटाव औद्योगिक वसाहतीतिल कारखान्यात अनेक ठिकाणाहून कायम कामगार,कंत्राटी कामगार वर्ग रोजी रोटीसाठी दुरहून सायकल व दुचाकी वाहने घेऊन कामासाठी येत असतात.तर याठिकाणी शाळा,कॉलेज व बँका असल्यामुळे रहदारी कायम सुरू असते.मात्र रोहा कोलाड रस्त्यावर धाटाव नाका,जैनवाडी, एक्सेल स्टॉप, रस्त्यावर  अवजड वाहने,टँकर,कंटेनर नेहमीच रस्त्यालगत उभी केलेली  असल्याने दरम्यान रहदारीला चांगलाच अडथळा निर्माण होत आहे.

याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक रहदारी करीत असल्याने अवजड वाहनांमुळे अर्धा रस्ता व्यापत असल्याने अनेक अपघात घडत आहेत.या अगोदर सुद्धा असे अनेक अपघात घडून काहींना जीव गमवावा लागला आहे.मात्र याला जबाबदार कोण?असा प्रश्‍न असताना संबंधित प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

 

अवश्य वाचा