पाली/बेणसे 

युगप्रवर्तक, कुळवाडीभुषण,बहुजन प्रतिपालक,पहिले नौदल स्थापन करणारे आरमाराचे जनक शत्रुच्या लेकी सुनामध्ये आपली आई बघणारे सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना आपल्या सैन्यामध्ये स्थान देणारे रयतचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 390 वी जयंती बौध्दजन समाज सेवा संघ व रमाई महिला मंडळ सिद्धार्थ नगर बेणसे  यांच्या विद्यमाने नुकतीची नालंदा बुद्ध विहारात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेणसे ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष पांडुरंग अडसुळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बेणसे ग्रामपंचायत सरपंच मधुकर पारधी उपसरपंच उध्दव कुथे, माजी सरपंच प्रिती कुथे,झोतिरपाडा ग्रामपंचायत माजी सरपंच सोनम पाटील शिवसेना विभाग प्रमुख अशोक भोय सदस्य राजेश गोरे, प्रगती गोरे, समाज सेवक चंद्रकांत पांडुरंग अडसुळे संदेश अडसुळे अनिल शिंदे  आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना  चंद्रकांत अडसुळे यांनी छ. शिवाजी महाराज हे मध्यकाळातील अलौकिक असे व्यक्तीमत्व होते. सत्ता हे समाजरक्षणाचे साधन म्हणून केवळ रयतहितासाठी सत्ता राबविणारे छत्रपती शिवाजी महाराज आजही साडेतिनशे वर्षानंतर सर्वांच्या हद्यसिंहासनावर अधिराज्य गाजवीत आहेत. छ. शिवाजी महराजांजवळ माणसे पारखण्याची तल्लख बुध्दीमत्ता होती.

जिवाला जिव देणारे अठरापगड जातीचे मावळे त्यांनी स्वराज्यहिताच्या कामी जोडले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व हे जातीधर्म निरपेक्ष स्वरुपाचे होते. आज देशाला त्यांच्या विचारांची नितांत गरज असल्याचे  चंद्रकांत अडसुळे यांनी सांगितले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर चंद्रकांत अडसुळे यांनी विचार मांडले.  अशोक भोय उध्दव कुथे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघपाल सावंत, भगवा शिंदे, सहदेव भगत,आदिनाथ अडसुळे,अशोक भगत ,सुरेश भगत आदिंनी मेहनत घेतली. तर रमाई महिला मंडळाच्या आशा भगत,नंदाबाई अडसुळे,  आशा शिंदे, कविता संतोष अडसुळे,छाया सावंत, अनुसया सावंत, पुनम सावंत, दिक्षा सावंत, आम्रपाला सावंत, कविता विशाल अडसुळे,आरती भगत,लिला येटम,अश्‍विनी भगत,सुवर्णा भगत,पुजा अडसुळे ,रेणुका भोईर,अर्चना अडसुळे,संजीवनी अडसुळे, शितल मोहिते यांसह असंख्य महिला पुरुष आणि युवक युवती उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाम सावंत यांनी केले तर आभार आदित्य भगत यांनी मानले.