पाली/बेणसे 

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या तथा बेणसे येथील माहेरवाशीण सुनंदा रमेश चव्हाण यांचे नुकतेच अल्पशा आजाराने वयाच्या 56व्या वर्षी निधन झाले. लोकहित समिती मेढे तालुका रोहाचे अध्यक्ष  व भारतीय बौद्ध महासभा ठाणे तालुका माजी अध्यक्ष रमेश चिंतामण चव्हाण यांच्या त्या पत्नी होत्या.  बुद्ध, कबीर, शिवराय, फुले शाहू, आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग असलेल्या कार्यकर्त्या म्हणुन त्यांची ओळख होती. त्या अतिशय प्रेमळ आणि मनमिळावू होत्या. प्रामाणिक व  कष्टाळु म्हणुन त्यांची ख्याती होती. त्यांनी आपल्या मुलांना शिक्षित करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. अतिशय शांत, सुस्वभावी व्यक्तिमत्वामुळे त्या सर्वपरिचित होत्या. त्यांच्या नम्र वाणीने  त्या सर्वांना जवळच्या वाटत असत. त्यांच्या अंत विधीला सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व  राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांच्या निधनाने आंबेडकरी व धम्म चळवळीची हानी झाली असल्याची शोकाकूल प्रतिक्रिया उपस्तीत मान्यवरांनी दिली.

सुनंदा चव्हाण यांचा जलदान विधी व शोकसभा दिनांक 27 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता लुम्बिनी बुध्दविहार लोकमान्य नगर पाडा  येथे आयोजित केले आहे.

त्यांच्या पश्‍चात पती रमेश  चव्हाण विवाहित  मुलगा रोशन चव्हाण,  सुन तेजल चव्हाण, अविवाहित मुलगा राकेश चव्हाण सासुबाईं व नातेवाईक असा मोठा परिवार आहे.