नवी दिल्ली 

काँग्रेसला उभारी द्यायची असेल तर काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला पाहिजे असा पुनरुच्चार काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी केला आहे. दिल्लीच्या दिवंगत मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित यांनी काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळत नसल्याबद्दल वरिष्ठ नेत्यांना जबाबदार धरलं होतं. याच वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया देताना काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जावी, असं मत शशी थरुर यांनी व्यक्त केलं आहे. अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकायची याची भीती वरिष्ठ नेत्यांना असल्याचा आरोप संदीप दीक्षित यांनी केला.

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा दुफळी सुरू झाली आहे. शशी थरुर यांनी यापूर्वीही अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याबाबत वक्तव्य केलं होतं. यावेळी ते म्हणाले, ङ्गसंदीपने जे मत जाहीरपणे व्यक्त केलं, तेच मत देशभरातील कार्यकर्ते आणि काही वरिष्ठ नेतेही खाजगीत व्यक्त करत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी ही काँग्रेस कार्यकारिणीला विनंती आहे.फ

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान कोण करणार याबाबतचंही उत्तर शशी थरुर यांनी दिलं. ङ्गकाही जण म्हणतात कुणी आणि कशासाठी मतदान करावं. अखिल भारतीय काँग्रेस समिती आणि पीसीसीच्या देशभरातील 10 हजार सदस्यांमार्फत मतदान व्हावं हे मी आठ महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. समितीमधील निर्वाचित सदस्यांसाठी हा मतदानाचा अधिकार असावाफ, असं शशी थरुर म्हणाले.

 

अवश्य वाचा