3 जून, 1818 रोजी नादान व बेजबाबदार दुसरा बाजीराव हा इंग्रज सेनापती जॉन माल्कम याच्या स्वाधीन झाला आणि पेशवाई संपून ब्रिटिशांचा अंमल सार्‍या महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानात सुरु झाला. खरे तर 20 फेब्रुवारी, 1818 रोजीच दुसरा बाजीराव संपला होता. याचे कारण या दिवशी पेशव्यांचा शेवटचा शूर कर्तबगार सेनापती बापू गोखले आष्टीच्या लढाईत धारातीर्थी पडले, तेव्हाच दुसर्‍या बाजीरावाचे नशीब फुटले. आपल्या तलवारीने वार्‍याच्या गतीने येणार्‍या इंग्रजांच्या बंदुकांच्या गोळ्यानां रोखून धरणारे बापू गोखले कोण?

नरहर गणेश गोखले. मूळचा रत्नागिरी मानर जिल्ह्यातला हा तरुण उत्तर पेशवाईत आपल्या काकांवरोबर पराक्रमाचा तमाशा दाखविण्यासाठी पुण्यात आला. सवाई माधवरावांच्या कारकिर्दीत त्यांच्या काकाने मोठी मर्दानकी दाखवून सरदारकी मिळवली होती. पुतण्यानेही आपल्या चुलत्याच्या पराक्रमाचा वारसा आपल्या तलवारीत उतरवला. काग्रीरंगपट्ठणच्या लढाईत या चुलत्या पुतण्यांनी टिपूची चांगलीच खोड मोडली होती. आपल्या शूरतेने आणि क्रुरतेने गुंडगिरी करुन लोकांना सतावणारा धोंड्या वाघ टिपूच्या हाती सापडला. टिपूने त्याला जीवदान दिले, ते तो मुसलमान बनल्यामुळे आणि सोडून दिले पेशव्यांच्या मुलखात धुमाकुळ घालायला. त्यांच्याशी  लढताना बापू गोखल्यांचे काका मारले गेले. बापूवरही  धोंड्याने वार केल्याने त्यांची अर्धी भुवई तुटली होती. तेव्हा धोंड्याला मारल्याशिवाय पागोटे घालणार नाही अशी भीष्मप्रतीक्षा बापूनी केली होती आणि धोंड्याला मारून त्यांनी ती पूर्णही केली. वासोट्याच्या किल्ल्यात ताई तेलिणीच्या पदराआड लपून बसणार्‍या बंडखोर परशुरामपंत प्रतिविर्धीना त्यांनी मोठ्या शिताफीने पकडून पेशव्यांच्या हवाली केले होते. त्यांच्या पराक्रमावर खूश होऊन ‘मराठी राज्याची समशेर’ हा किताब पेशव्याने त्यांना दिला होता. तसेच परशुरामपंतांचा सर्व मुलुखु बापूंनाच बदीस म्हणून दिला होता. हलक्या कानाच्या दुसर्‍या बाजीरावाला बापूंच्या वाढत्या सामर्थ्याची शंका आल्याने आपल्या मुलुखावर पाणी सोडण्याची आज्ञा करताच क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपली मिळकत पेशव्याच्या हवाली केली तेव्हा मात्र बाजीरावांची मर्जी त्यांच्यावर बसली ती कायमचीच. दुसर्‍या  बाजीरावाने त्यांना 13 लाखांची जहागिरी, 5 हजार फौज कायम ठेवण्याची परवानगी आणि सेनापतीपद देऊन त्यांचा गौरव केला.

बापू गोखलेंचे वर्तन अतिशय करारी होते. ‘पेठारांच्या  बंदोबस्तासाठी आपली फौज घेऊन ताबडतोब या अशी आज्ञा करणार्‍या  इंग्रजांना त्यांनी ठणकावून सांगितले, मी फक्त पेशव्यांची आज्ञा मानतो.’ आपल्या खासगी जीवनात ते प्रभू रामचंद्रांसारखे एकपत्नी होते. दुसरा बाजीराव तसा स्त्रीलंपट. आपल्या सरदाराच्या बायकांना जेवणाच्या निमित्ताने वाड्यावर बोलवत असे. एके प्रसंगी बापूंकडे पाहून आपल्या पत्नीला का आणले नाही असे विचारताच कंबरेची तलवार काढून पाटावर ठेवताच काळजात चर्र होऊन दुसरा वाजीराव जास्त न बोलता खाली मान घालून निघून गेला.

बाजीरावांची सेवा म्हणजे मराठी दौलतीची सेवा या एकाच पद्धतीने ते लढत होते आणि म्हणून आपला एकुलता एक मुलगा लढाईत मारला गेल्यानंतरही अवघ्या तिसर्‍या दिवशी इंग्रजांशी चार हात करायला बापू सिद्ध झाले. खडकीच्या लढाईतही बापूंनी पराक्रमाची शर्थ केली. खुद्ध एलफिस्टनसाहेब आपला जीव वाचवून पळाला तथापि बाजीरावांच्या धरसोड वृत्तीमुळे बापूंना अचूक निर्णय घेता आला नाही. परिणामी जिंकलेली लढाई हरली.

तसे पाहिले तर 16 नोव्हेंबर, 1817 रोजी येरवड्याच्या मैदानावर मराठ्यांचा पराभव झाल्यावर बाजीरावांच्या पलायनाच्या नाट्याला सुरुवात झाली. त्याला वाचविण्यासाठी बापूंना मात्र आपल्या प्राणाची बाजी लावायला लागत असे. हे पलायन नाट्य 20 फेब्रुवारी, 1817 ला अखेर पंढरपूरजवळील आष्टी  या ठिकाणी येऊन थांबले.

 आपल्या मनगटावर अजूनही बापूंचा विश्‍वास होता. जनरल रिमिय आष्टीजवळ आल्याचे समजताच कमरेच्या शेल्यात भली मोठी तलवार खोचून बापू युद्धाला तयार झाले. बापू दुर्बिणीतूनच इंग्रज फलटण न्याहाळत होते. ‘हर हर महादेव’ची गर्जना करीत बापू इंग्रजांच्या फौजेत घुसले. उभयपक्षी घनघोर लढाई होऊन बापू गोखल्यांनी शौर्याची शर्थ केली. दीड प्रहर उलटला तरी लढाई सुरूच होती. रक्तबंबाळ बापू जनरल समितीवर धावून गेले. तलवारीच्या एका घावात त्यांनी रिमिथच्या तलवारीचे दोन तुकडे केले. जीव वाचविण्यासाठी रिमिथ पळाला. त्याचे गोरे अंगरक्षक बापूच्या तलवारीने न्हाऊन निघाल्यावर लांबून स्मिथने पिस्तुलाच्या गोळ्या बापूंच्या छातीवर घातल्या आणि बापू घोड्यावरून कोसळले. तेव्हा वयाची चाळीशीही बापूंनी गाठली नव्हती. त्यांच्या पत्नीने आपला पती लढाईत मारला गेला हे मानण्याचेच नाकारले. इतका विश्‍वास त्यांना आपल्या नवर्‍याच्या तलवारीवर होता.? लढाईत बापूंबरोबर गोविंदराव घोरपडेंसह आणखी बरेच मराठे सरदार मारले गेले. ‘बापू पडला आणि दुर्देवाला सुरुवात झाली’ । खुद्द दुसर्‍या बाजीरावाने काढले.मराठी राज बुडाल्यावर इंग्रजांनी अनेकांना मानाने वागवले अपवाद फक्त बापू गोखल्यांचा. त्यांची सारी दौलत इंग्रजांनी जप्त केली. यावरूनच बापू गोखलेंचा पराक्रम दिसून येतो. तथापि ज्या धन्यासाठी म्हणजे दुसर्‍या बाजीरावासाठी बापू लढत होते, तो दुसरा बाजीराव मात्र लढाई संपण्यापूर्वीच बापूंना सोडून पळाला, हे बापू गोखल्यांच्याराजनिष्ठेचे दुर्र्देव