छत्रपती शिवाजी महारांची जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेत असताना या त्यांच्या स्वराज्यात स्त्रियांच्या रक्षणाला महत्त्व दिले होते, हे लक्षात घेतले पाहिजे.

यानिमित्ताने शिवकालीन प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. सूर्य उतरणीला जात होता. तांबूस-लालसर किरणे पूर्ण धरती व्यापून पसरली होती. त्यात माघ महिन्याचा  गार वारा सुटला होता. स्वराज्याचे दिवस हळूहळू बदलत होते. पण, तरी मात्र आऊसाहेब थोड्या चिंतेत दिसत होत्या. सूर्यनारायणाकडे त्या एक टक लावून पाहात होत्या. त्यांच्या मुखकमलावर उदासपणा दिसून येत होता. हा उदासपणा शिवरायांच्या डोळ्यातून लपला गेला नाही. त्यांनी आऊसाहेबांना प्रश्‍न केला, काय झालं आऊसाहेब, आपण चिंतेत दिसत आहात? दीर्घ  घेत आऊसाहेब उत्तरल्या, ‘पन्हाळा गड स्वराज्यात नाहीये शिवबा, त्यामुळे तिथल्या कित्येक आया-बायका मोगलांनी पळून नेल्या आहेत. आपल्या स्वराज्यातील स्त्री सुरक्षित नसेल तर आम्ही मुक्तपणे श्‍वास कसा घेऊ सांगा?’ आऊसाहेबांची होणारी घालमेल शिवबांना समजत होती. स्वराज्यात प्रत्येक स्त्रीला मोकळा श्‍वास घेता आला पाहिजे, हीच माँसाहेबांची इच्छा होती. स्वराज्यात स्त्रीवर अत्याचार  विचार कोणी करु शकत नव्हते. कारण, तिथली न्यायव्यवस्था खूप कडक शिस्तीची. चौरंग केला जायचा, टकमक टोकावरून ढकलून दिलं जायचं. तरीही पन्हाळ्याच्या वाटा सुरक्षित नव्हत्या. कोकणात येणार्‍या पन्हाळ्याच्या वाटेवर खूप सार्‍या मराठी स्त्रिया बेपत्ता झाल्या होत्या.म्हणून पन्हाळ्याची मोहीम महाराजांनी कोंडाजी फर्जंदाना दिली. स्वतः महाराज त्या मोहिमेवरुन 2000 सैन्याशी पुन्हा परतले  तरीही गड स्वराज्यात आलेला नव्हता. आदिलशहाला तहात मिळालेला हा किल्ला प्रथम स्वराज्यातच होता. तेव्हा सिद्दी जोहर चाळीस हजार सैन्यानिशी सात ते आठ महिने गडाला वेढा घालून बसला होता. तरीही तो गड त्याला काबीज करता आला नाही. कोंडाजींनी जेव्हा पन्हाळ्याचा विडा उचलला, तेव्हा महाराज आपसूकच म्हणाले, ‘बोला फर्जंद, मोहिमेसाठी किती  नेणार आहात, तीन हजार की पाच हजार?’ फर्जंदानी नकारार्थी मान डोलावली. महाराज प्रश्‍नार्थक नजरेने फर्जंदाना म्हणाले, मग दहा हजार? कोंडाजी किंचित हसून म्हणाले, ‘फक्त साठ राजे!’ महाराजांना आश्‍चर्य वाटले, पण त्यांना दृढ विश्‍वास होता, की स्वराज्याच्या एका मावळ्यात दहा हजार मावळ्यांची शक्ती आहे. आणि अमावस्येच्या रात्री पन्हाळ्यावर केलेला गनिमी  पूर्णपणे यशस्वी झाला. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत सुमारे 83 हजार महिला बेपत्ता आहेत. 83 हजार महिला म्हणजे दुर्लक्ष करण्यासारखा विषयच नाहीये मुळी आणि ह्या त्या 83 हजार महिला म्हणजे, आज कुणाची तरी आई, बहीण, बायको, काकू एका-एका घरातून गायब झाली असेल. त्यांचा शोध कधी लागू शकेल का? हा एक  आहे आणि खरं सांगू का, त्याचे उत्तरही मला माहीत आहे, नुकताच हैदराबाद बलात्कार नावाचा अमानुष आणि व अमानवीय असा प्रकार भारत देशात घडून आला. तो कोठे झाला? आणि कसा झाला? खरं तर, मी हे कोणाला सांगायलाच नको; पण तो का झाला, या गोष्टीवर आपण नक्की विचार करायला हवा. या  शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपण नुसतेच रायगडावरून येऊ नका, तर तिथल्या मातीला कपाळी लावून शपथ घ्या, की महाराष्ट्रातील कुठलीही स्त्री- कुठल्याही प्रकारचा अत्याचार सहन करुन घेणार नाही आणि तो होणारा अत्याचार महाराजांचा शूर मावळा कधीही डोळ्यांपुढे होताना पाहणार नाही. जगदंब!

अवश्य वाचा