मुंबई 

सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे, मुख्यमंत्र्यांशी योग्य समन्वय ठेवा. वादग्रस्त वक्तव्ये टाळा, असा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिल्या. पवारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठीकत शरद पवारांनी सर्व मंत्र्यांना खात्यांतर्गत निर्णय घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी समन्वय ठेवा. वादग्रस्त मुद्दे टाळा. वादग्रस्त विधानं करु नका, अशा सूचना दिल्या.

मुंबईतील यशवंतराच चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांशी चर्चा केली. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे यांच्यासह 16 मंत्री उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या कोट्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ,  राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील हे बारा कॅबिनेट मंत्री आहेत. तर दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे हे चौघे राज्यमंत्री आहेत.

भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासावर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एनआयएकडे तपास सुपूर्द करणं, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असल्याचं सांगतानाच पवारांच्या बोलण्यात नाराजी जाणवल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्‍वभूमीवर फक्त राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक शरद पवारांनी बोलावल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं.

अवश्य वाचा