पेण 

 भारतीय बौध्द महासभा पेण तालुक्याच्या वतीने लिंम्बिनी बुद्ध विहारा वाशी येथे दहा दिवसांच्या श्रामणेर व बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पुज्य भन्ते सुमेध बोधी यांनी 14 उपासकांना ध्यान साधना देऊन तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पंचशिलाचे आचरण त्यांचे उपदेश यांचे मार्गदर्शन केले.

  या शिबिराच्या सांगता समारंभाला भा.बौ.महासभेचे राज्य कोषाध्यक्ष विजय कांबळे, जिल्हाध्यक्षा संपदा चव्हाण, सरचिटणीस विजय गायकवाड, नगरसेविका प्रतिभा जाधव, तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, संतोष गायकवाड, राजेश भालेराव, मारुती शिंदे, सचिन कांबळे, राहुल कांबळे, राम जाधव, सुनिल कांबळे आदि पदाधिकार्‍यांसह तालुक्यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्षा संपदा चव्हाण म्हणाल्या की बौद्ध महासभेच्या माध्यमातून देशात अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहेत. पेण तालुक्यातील शाखेच्या वतीने चांगले काम सुरू असून शिबिरार्थ बसलेल्या भन्ते गणांनी यापुढे धम्माच्या कार्याचा अभ्यास समाजाच्या उन्नतीसाठी करावा असे त्यांनी यावेळी सांगितले. तर सदर शिबिराला पेण नागोठणे पनवेल तालुक्यातील अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केल्याबद्दल त्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल, गुलाब पुष्प व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 

अवश्य वाचा