रत्नागिरी

 आकडा सांगण्यापेक्षा कृतीला महत्व देणारे आपलं सरकार आहे.  त्यामुळे आपणास जी कामे करायची त्याचे आराखडे सादर करा.  निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही.  गणपतीपुळेच नव्हे तर कोकणसह नवा महाराष्ट्र घडवायचं काम आपण सर्व जण मिळून करु असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज केले.

गणपतीपुळे येथील 102 कोटींच्या विकास आराखड्याचे भूमीपूजन आज मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झाले.  त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.  कार्यक्रमास व्यासपीठावर उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री ड अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, खासदार विनायक राऊत, आमदार हुस्नबानू खलिफे, राजन साळवी, भास्कर जाधव, शेखर निकम, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

आजचा दिवस माझ्यासाठी तिर्थयात्रेचा दिवस आहे असे सांगून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी वास्तूचा लोकार्पण सोहळा अर्थात शौर्यदिन साजरा करुन मी इथे आलोय आणि येथून आंगणेवाडीला जाणार आहे.  त्यामुळे एक पवित्र दिवस आज आहे असे मी मानतो.  ुंबईतही समुद्र आहे आणि कोकणातही.  पण कोकणातला समुद्र स्वच्छ व नितळ आहे.  हे मी दुर्गांचे छायाचित्रण करताना बघितलय.  इथल्या मातीतील माणसं ही अशीच निर्मळ आहेत.  या कोकणचा विकास करताना निधी कधीच कमी पडू देणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.  

 

अवश्य वाचा