महाड

ऐतिहासिक आणि पौराणिक पार्श्‍वभूमी लाभलेल्या महाड,पोलादपूर तालुक्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासाकडे राज्यकर्त्यांनी गांभीर्याने पाहून या सर्व पर्यटन स्थळांचा विकास केला पाहिजे,अशी अपेक्षा सर्वसामान्यांसह पर्यटकातून व्यक्त होत आहे.त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मितीही या माध्यमातून निर्माण होणार आहे. शिवभक्तांच्या मागणी वरुन किल्ले रायगड आणि पोलादपुर तालुक्यांतील नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्म गाव असलेली ठिकाणे विकसीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.अश्याच प्रकारे अन्य ऐतिहासिक प्रेक्षणिय स्थळांचा विकास केल्यास या परिसरांमध्ये पर्यटन विकास होऊन स्थानिक तरुणांना रोजगार मिळणार आहे.

महाड शहरांतील चवदार तळे परिसर शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करुन विकसित केला,शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे केले.बार्टी या खाजगी संस्थे कडे स्मारकाचा ताबा देण्यांत आल्या नंतर इमारतीचे सफाई आणि दुरुस्तीचे काम योग्य प्रकारे केले जाते.त्याच बरोबर स्मारकांमध्ये वाचनालय,नाट्यगृह तरण तलाव इत्यादी सुवीधा देखिल उपलब्द करुन देण्यांत जरी आल्या असल्या तरी त्याचा सर्व सामान्य नागरिकाना फारसा उपयोग होत नाही.शासनाने इमारती मधील अन्य सुवीधा देखिल उपलब्द करुन देणे गरजेचे आहे.महाड पोलादपुर तालुक्यांत असलेल्या ऐतिहासिक स्थळा वरुन पर्यटन क्षेत्र विकास निधी कोट्यावधी रुपयांचा  खर्च करण्यांत आला,त्यांतील कांही कामे पुर्ण झाली तर कांही कामे अपुर्ण राहीली आहेंत.

राष्ट्रपुरुषांची स्मारके

 महाड तालुक्यांतील छत्रपती शिवाजी महाराजांचे राजधानीस्थळ किल्ले रायगड,राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांचे समाधीस्थळ,समर्थ रामदास स्वामी यांचे शिवथरघळ,महाड शहरांतील चवदार तळे,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक,वाळण कोंडी,गांधार पाले आणि कोल येथील बोध्दलेणी,त्याच प्रमाणे पोलादपुर तालुक्यातील नरवीर तानाजी मालुसरे योचे समाधीस्थळ,स्वामी परमानंद यांचे समाधीस्थळ तसेच छत्रपती शिवाजी महाराजाचे गडकोट किल्ले या मध्ये मलंगगड,सोनगड,लिंगाणा,चांंभारगड,अशी एक ना अनेक ऐतिहासिक ठिकाणे महाड आणि पोलादपुर तालुक्यामध्ये असताना शासना कडून दुर्लक्षीत राहीले आहेंत.

किल्ले रायगडचा विकास

 शिवभक्तांचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजधानी  स्थळ असलेल्या किल्ले रायगडच्या विकासाकडे शासनाने विषेश लक्ष दिल्याने मागिल सरकारने 650 कोटी रुपंयाचा निधी मंजुर करुन युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या मार्गदर्शना खाली काम देखिल सुरु करण्यांत आले आहे.येत्या कांही दिवसा मध्ये किल्ले रायगडचे गत वैभव पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.याच बरोबर पाचाड येथील राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांचे समाधीस्थळ देखिल विकसित करण्यांत येणार आहे.

पाचाड गावांतील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असुन येणाछया पर्यटकांची फार मोठी गैर सोय होते.जानेवारी महिन्या पासुनच पाचाड मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असल्यामुहे येणाछया पर्यटकांना पाणी विकत घ्यावे लागते.मागिल वर्षी जिजामाता तलावाचे काम करण्यांत आले त्या नंतर या तलावा मध्ये पाण्याचा साठा शिल्लक राहातो.हे पाणी जानेवारी पेैब्रुवारी पर्यत गावाला पुरते त्या नंतर टॅकर पाणी पुरवठा करावा लागत आहे.

 दलितमित्र मधुकर कांबळे  

 

अवश्य वाचा