आगरदांडा,

 मुरूड-जंजिरा नगरपरिषद व शिवजयंती उत्सव समिती  च्या वतीने प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी येत्या 19 फेब्रुवारीला  साजरी करण्यात येणारी शिवजयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे.

 सकाळी 8 वाजता नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या  हस्ते   नगरपरिषद येथील शिव पुतळयास पुष्पहार अर्पण करतील.तसेच शहरातील विविध ठिकाणी असणारे शिव पुतळयास मान्यवराच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करतील.  सायंकाळी 4वाजता बापुजीदेव मंदिर, लक्ष्मीखार येथून शिवप्रतिमेची सवाद्य मिरवणूक.,सायंकाळी 6वाजता  नगराध्यक्षा चषक  शालेय विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा इत्यादी विविध कार्यक्रमानी शिवजयंती साजरी होणार आहे. आशी माहिती  नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी सांगितले.  यावेळी मुख्याधिकारी- अमित पंडीत,उपनगराध्यक्षा- नौसिन दरोगे पांडुरंग आरेकर ,  वक्तृत्व स्पर्धा  समिती प्रमुख - सुरेश उपाध्ये  सर्व सन्माननीय  नगरसेवक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

अवश्य वाचा